सांगोला नगरपालिकेच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध
सांगोला : (कटुसत्य वृत्त):- सांगोला नगरपालिकेच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीसाठी ११ प्रभागनिहाय ४४६ हरकतींवर पडताळणी करण्यात आली. नगरपालिका निवडणुकीसाठी सुमारे ३३ हजार ६९८ मतदारसंख्या निश्चित करून नगरपालिका प्रशासनाने अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली
आहे. यामध्ये सर्वात कमी प्रभाग क्र. ३ मध्ये मतदार संख्या २०७३, तर प्रभाग क्र. ११ मध्ये ३९५२ सर्वाधिक मतदारांची नोंद झाली आहे.
सांगोला नगरपालिकेसाठी तब्बल ९ वर्षांनंतर सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक होत आहे. सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. सुधीर गवळी यांनी मतदार संख्येनुसार अंतिम प्रभाग रचना केली. नगराध्यक्ष पद आरक्षण सोडत झाल्यानंतर नगरपालिकेकडून ११ प्रभागनिहाय आरक्षण सोडतही झाली आहे.
यंदाच्या निवडणुकीत जनतेतून नगराध्यक्षपद निवडले जाणार आहे. तर ११ प्रभागातून १२ महिला व ११ पुरुषांना नगरपालिकेत जाण्याची संधी मिळणार आहे. दरम्यान, ११ प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध
केल्या होत्या. त्यावर नागरिकांच्या सुमारे ४४६ हरकती प्राप्त झाल्या होत्या. नगरपालिकेत प्राप्त
हरकतीवर मतदारांची प्रभाग निहाय पडताळणी करून सोमवारी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या पुढील कामकाजाला वेग आला आहे.
प्रभागनिहाय मतदार संख्या..
• प्रभाग १ : १४८१ पुरुष, १५२७ स्त्री असे एकूण ३०१० मतदार
• प्रभाग २ : १७५ पुरुष, १७२४ स्त्री असे एकूण ३४७५ मतदार
• प्रभाग ३ : १०१२ पुरुष, २०५४ स्त्री असे एकूण २०७३ मतदार
• प्रभाग ४ : १४२७ पुरुष, १६८२ स्त्री असे एकूण ३३०९ मतदार
• प्रभाग ५ : १५२५ पुरुष, १५२८ स्त्री असे एकूण ३०५३ मतदार
• प्रभाग ६ : १४८९ पुरुष, १३४२ स्त्री असे एकूण २८३८ मतदार
• प्रभाग ७ : १५१८ पुरुष, १३६५ स्त्री असे एकूण २८८३ मतदार
• प्रभाग ८ : १३७२ पुरुष, १३६५ स्त्री असे एकूण २७३७ मतदार
• प्रभाग ९ : १५२१ पुरुष, १६७० स्त्री असे एकूण ३१११ मतदार
• प्रभाग १० : १५२३ पुरुष, १६५४ स्त्री असे एकूण ३१७७ मतदार
• प्रभाग ११ : २०१२ पुरुष, १९४० स्त्री असे एकूण ३९५२ मतदार
• अशी ११ प्रभागनिहाय सुमारे ३३ हजार ६९८ मतदारांची संख्या आहे.

0 Comments