पंढरपूर अर्बन बँकेस सहकार पुरस्कार
पंढरपूर /(कटुसत्य वृत्त):- ११३ वर्षाची उज्वल परंपरा व महाराष्ट्र राज्य कार्यविस्तार असणाऱ्या दि पंढरपूर अर्बन को ऑप बँकेस विशेष उल्लेखनीय कामगिरीबद्दल नवराष्ट्र सहकार पुरस्कार २०२५ ने गौरविण्यात आले. हा पुरस्कार वितरण सोहळा यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे राज्याचे सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी बँकेचे वतीने चेअरमन सतीश मुळे, संचालक हरीश ताठे, मनोज सुरवसे, मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश विरधे, व्यवस्थापक गणेश हरिदास हे पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित होते.
ग्राहकांचा विश्वास व सदिच्छा हा आमच्या यशाचा मूळ गाभा आहे. म्हणून हा बँकेला मिळालेला पुरस्कार हा आपल्या सर्व ग्राहक, सभासद, ठेवीदार, हितचिंतक यांना मी समर्पित करतो अशी भावना बँकेचे चेअरमन सतीश मुळे यांनी व्यक्त केली. पुरस्कार देऊन आम्हाला सहकार क्षेत्रात कार्य करीत असताना ऊर्जा देणाऱ्या व आपल्या कार्याची दखल घेतल्याबद्दल बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश विर यांनी आयोजकांचे आभार व्यक्त केले.
यावेळी सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील, वस्त्रोद्योग मंत्री ना. संजय सावकारे, महाराष्ट्र राज्य सहकार फेडरेशनचे अध्यक्ष आ. प्रवीण दरेकर, वारणा समूहाचे सर्वेसर्वा आ. विनय कोरे, आ. प्रसाद लाड, मुख्य सचिव महाराष्ट्र सरकार वस्त्रोद्योग विभाग प्रविण दराडे यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

0 Comments