सोलापूर महापालिकेसाठी ६ डिसेंबरला होणार अंतिम मतदार यादी प्रसिद्ध
मतदार यादी सुधारित कार्यक्रम जाहीर १४ नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार
सोलापूर / (कटुसत्य वृत्त):- राज्य निवडणूक आयोगाने सोलापूर महापालिकेसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी सुधारित कार्यक्रम- २०२५ जाहीर केला आहे.
राज्य निवडणूक आयोगाने १४ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीनुसार सुधारित कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या
तारखेस विधानसभेच्या मतदार यादीवरून महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी तयार केलेली प्रारूप मतदार यादी हरकती व सूचना मागवून प्रसिद्ध करण्यासाठी दि. १४ नोव्हेंबर, प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याचा अंतिम दि. २२ नोव्हेंबर, प्रारूप मतदार यादीवरून दाखल
हरकतींवर निर्णय घेऊन प्रभाग निहाय अंतिम मतदार याद्या प्रमाणित करून प्रसिद्ध करणे ६ डिसेंबर, मतदान केंद्राच्या ठिकाणी यादी प्रसिद्ध करणे ८ डिसेंबर, मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करणे १२ डिसेंबर २०२५ याप्रमाणे राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी सर्व महापालिका आयुक्तांना या कार्यक्रमानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

0 Comments