दक्षिण सोलापूर (कटुसत्य वृत्त):- आमदार सचिन यांच्या वाढदिवसानिमित्त कुंभारी येथील घरकुल परिसरात दयानंद बाराचारे मित्रपरिवारातर्फे आयोजित रक्तदान शिबिरात ७१ जणांनी रक्तदान केले. परिसरातील नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेत 'रक्तदान हेच 'महादान' या संदेशाला प्रत्यक्ष कृतीतून उजाळा दिला.
यावेळी अप्पासाहेब बिराजदार, काशीनाथ बाराचारे, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष महेश बिराजदार उपस्थित राहून आयोजक व रक्तदात्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. समाजसेवा आणि रक्तदान यांचा संगम म्हणजे खरी जनसेवा - हे या उपक्रमातून स्पष्ट दिसले. दयानंद बाराचारे मित्रपरिवाराने राबवलेला हा उपक्रम युवा पिढीला समाजकार्यात सक्रीय होण्याची प्रेरणा देणारा ठरला आहे.

0 Comments