मुळेगावतांडा येथे आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
तालुका प्रतिनिधी
दक्षिण सोलापूर
दक्षिण सोलापूर (कटुसत्य वृत्त):- तालुक्यातील मुळेगाव तांडा येथे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वसंतराव नाईक तांडा सुधार समितीचे
अध्यक्ष संदीप राठोड यांनी या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे.
यावेळी तांडा सुधार समिती अध्यक्ष संदीप राठोड म्हणाले, आज धकाधकीच्या युगामध्ये तरुणवर्ग
वसंतराव नाईक तांडा सुधार समितीचे अध्यक्ष संदीप राठोड यांचा उपक्रम व्यसनाधीनतेकडे वळत आहे. त्यांना क्रिकेटच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्याचबरोबर समाजातील तांड्याची ओळख पुसून काढण्यासाठी संदीप राठोड मित्रपरिवाराच्या वतीने भव्य अशा आमदार चषक २०२५ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. या उद्घाटन कार्यक्रमासाठी जी. एम. ग्रुपचे अध्यक्ष बाळासाहेब
बाघमारे, मोतीरामभाऊ राठोड, अण्णाराव बाराचारे, केदार विभूते,
सिद्धराम हेले, नेताजी खंडागळे, मधुकर चिवरे, प्रवीण चौगुले, श्रीमंत हक्के, गुड्डू पटणे, आप्पा साखरे, बालाजी यादव, सागर खांडेकर, शरणाप्पा चवरे, सीताराम राठोड. वैभव हलसगे, शंकर राठोड, काशिनाथ पवार, रमेश राठोड, शिवाजी पवार, शिवाजी राठोड, शिवाजी चव्हाण, यशवंत शेंडगे, हिरो जाधव, अनिल राठोड, अशोक राठोड, मिथुन राठोड, सोमनाथ जाधव, बाबू पवार, युवराज पवार, राजू पवार, नीरज पवार, किशोर जाधव यांच्यासह विविध गावचे सरपंच, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
चौकट
आमदार चषक स्पर्धेसाठी बक्षीस
प्रथम बक्षीस १ लाख ११ हजार, द्वितीय बक्षीस ५१ हजार, तृतीय बक्षीस २५ हजार असणार आहे. तसेच स्पर्धेमध्ये विशेष प्राधान्य मिळवलेल्या खेळाडूसाठी बक्षीस असून त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॉलर, बेस्ट खेळाडू, बेस्ट बॅट्समन, बेस्ट फिल्डर आदींचा समावेश असणार आहे.

0 Comments