Hot Posts

6/recent/ticker-posts

स्थानिक नागरिकांशी स्नेहसंवाद व पदवीधर मतदार नोंदणी बैठक !

 स्थानिक नागरिकांशी स्नेहसंवाद व पदवीधर मतदार नोंदणी बैठक !

मोरवड, करमाळा (कटूसत्य वृत्त):-करमाळा तालुक्यातील मोरवड येथे स्थानिक नागरिकांची मनमोकळा संवाद साधला. याप्रसंगी पदवीधर मतदार नोंदणीबाबत विशेष बैठक घेऊन नागरिकांना लोकशाही क्रियेत सक्रिय सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. खरंतर पदवीधर मतदार नोंदणी ही केवळ एक क्रिया नसून ती सुशासन, जबाबदार नेतृत्व आणि लोकशाही बळकटीचा पाया आहे, हे अधोरेखित करण्यात आले. या स्नेहसंवादादरम्यान तरुणांशी व्यावसायिक दृष्टिकोनातून संवाद साधून स्वावलंबनाचे महत्त्व स्पष्ट करत स्वावलंबी तरुणच गाव, तालुका आणि जिल्ह्याच्या प्रगतीचा खरा पाया ठरतात, असा विश्वास व्यक्त केला. तसेच, शेतकरी बांधवांशी आधुनिक शेतीविषयी संवाद साधत तंत्रज्ञानाचा वापर आणि नव्या शेती पद्धतींचा अवलंब करण्याचे आवाहन केले. यासोबतच शिक्षक मतदारसंघ व पदवीधर मतदारसंघ याबाबत माहिती देऊन सर्वांनी जास्तीतजास्त मतदार नोंदणी करण्याचे आवाहन केले. यावेळी विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे सर, प्रदेश सचिव दीपक चव्हाण, शशिकांत पवार, नगरसेवक अतुल फंड, मातोश्री वृद्धाश्रमचे अध्यक्ष तात्यासाहेब गोरे, सरपंच भोजराज सुरवसे, ॲड. राहुल सावंत, नगरपालिका कॉन्ट्रॅक्टर विश्वास कळेपाटील, किरण बोकन, प्रकाश माने, शेळके कुंडलिक, गटकल सर, शिक्षक संघटनेचे पदाधिकारी तसेच इतर मान्यवर, हितचिंतक व नागरिक उपस्थित होते. यावेळी सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागाबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त करत लोकशाही अधिक सक्षम आणि सबळ करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
Reactions

Post a Comment

0 Comments