आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त घरकुल परिसरात रक्तदान
कुंभारी (कटूसत्य वृत्त):- आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त कुंभारी येथील घरकुल परिसरात समाजहिताच्या भावनेतून दयानंद बाराचारे मित्रपरिवारातर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. समाजसेवेच्या उत्कट भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला परिसरातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिबिरात एकूण ७१ जणांनी रक्तदान करून “रक्तदान हेच महादान” या संदेशाला प्रत्यक्ष कृतीतून उजाळा दिला. या माध्यमातून समाजातील गरजू रुग्णांना नवजीवन देण्याचे पवित्र कार्य पार पडले.
कार्यक्रमादरम्यान अप्पासाहेब बिराजदार, काशीनाथ बाराचारे, तसेच अनेक ग्रामस्थ, कार्यकर्ते व स्वयंसेवक उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्यामुळे शिबिराचे आयोजन यशस्वीपणे पार पडले.
या प्रसंगी महेश बिराजदार – जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा (भा.ज.यु.मो.) यांनी उपस्थित राहून आयोजक व रक्तदात्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. आपल्या मनोगतात त्यांनी म्हटले की, “समाजसेवा आणि रक्तदान यांचा संगम म्हणजे खरी जनसेवा — या उपक्रमातून त्याचे प्रत्यंतर मिळाले. दयानंद बाराचारे मित्रपरिवाराने राबवलेली ही चळवळ युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहे.”
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी दयानंद बाराचारे मित्रपरिवार तसेच ग्रामस्थांनी एकदिलाने प्रयत्न केले. संपूर्ण परिसरात या समाजोपयोगी उपक्रमाचे कौतुक होत आहे.

0 Comments