भारतीय जनता पार्टी प्रभाग क्र १९ काशेवाडी लोहियानगर व
डेक्कन मल्टीस्पेशालिटी हार्डीकर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने
मोफत आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी करून मोफत चष्मे वाटप
भारतीय जनता पार्टी प्रभाग क्र १९ काशेवाडी लोहियानगर व डेक्कन मल्टीस्पेशालिटी हार्डीकर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी करून मोफत चष्मे वाटप करण्यात आले . भवानी पेठमधील कार्यक्षम नगरसेविका मनिषा लडकत यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे झालेल्या शिबिराचे उदघाटन आमदार सुनिल कांबळे यांच्याहस्ते करण्यात आले . तसेच यावेळी कार्यक्रमाच्या आयोजिका नगरसेविका सौ मनिषा संदीप लडकत , माजी नगरसेवक संदीप लडकत ,स्वीकृत नगरसेवक छगन बुलाखे , मामा देशमुख , शशिधर पुरम , उमेश शिंदे , मुन्नवर खान , किशोर शिंगवी , शारदा लडकत , रवी लडकत , सुशील भुजबळ , सचिन बांदल , पांडुरंग मेमाणे , सतीश पवार , अनुराधा घोरपडे , नंदू बाणेकर , नंदू बनकर , सुशील मंडळ , प्रसाद लडकत , अभिजित लडकत , प्रमेय लडकत , किरण लालबेगी , मंदार लडकत , सुयश लडकत , सनी लोखंडे , राजू काळे , वैष्णवी लडकत , राजू काळे , वैष्णवी लडकत , सोहन थोरात , राजू काळे व गणेश कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी ३०० लोकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले . या आरोग्य शिबिरामध्ये हाडांचे ठिसूळता तपासणी , चरबी प्रमाण मोजणे , रक्तशर्करा तपासणी , रक्तदाब तपासणी करून तज्ञ डॉक्टरांनी मोफत मार्गदर्शन केले .
यावेळी डॉ नागेश नागवेकर , डॉ. विजयकुमार मोगा , डॉ. प्रशांत भांबुरे , डॉ. मनविल कोटकर , अश्विनी डाकने , निकिता पोपलकर व पूनम सिस्टर यांनी केले होते .


0 Comments