सोपान पवार यांच्या कवितेची निवड:
कळंब(प्रतिनिधी) विद्याभवन हायस्कूल, कळंब येथील मराठी विषयाचे सहशिक्षक सोपान पवार यांच्या ' शिक्षणाची वारी ' या कवितेची उस्मानाबाद येथे होणाऱ्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात 'कवी कट्टा ' या मंचावर सादर करण्यासाठी निवड करण्यात आली. दि.१०जानेवारी दुपारी ३.००ते ४.०० या वेळेत कवितेचे सादरीकरण होणार आहे. या निवडीबद्दल संस्थेचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर.अध्यक्ष प्रा आबासाहेब बारकुल, प्रशालचे मुख्याध्यापक पवार व्ही .एस. उपमुख्याध्यापिका धाबेकर आर. बी. पर्यवेक्षक खंदारे एस.जे. बारकुल एस.एस. गिडे एस.ए. रामटेके सर मयाचारी व्ही . एस. सोनके जे.एस.बावकर एस. एम. पवार डी.बी. तीर्थकर एस.एस.सांवत वाय.बी. आदीनी अभिनंदन केले.

0 Comments