मोहोळ येथे 11 डिसेंबर रोजी भव्य कृषी प्रदर्शन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, December 1, 2019

मोहोळ येथे 11 डिसेंबर रोजी भव्य कृषी प्रदर्शन

मोहोळ येथे 11 डिसेंबर रोजी भव्य कृषी प्रदर्शन   

राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त
ज्योती क्रांती परिषद यांच्या वतीने 11 डिसेंबर ते 15 'डिसें  दरम्यान वन मॅन शो क्रिकेट मैदान नेताजी प्रशाल जवळ मोहोळ येथे
शरद कृषी महोत्सव या नावाने भव्य आशा कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी दिली.
          आधुनिक शेती व नवनवीन शेती प्रयोग पाहण्यासाठी ग्रामीण भागातील शेतकऱ्याना मोठ्या शहराच्या ठिकाणी जावे लागू नये त्याच बरोबर ग्रामीण भागातील
शेतकऱ्याना अधुनिक वेगवेगळया पध्दतीच्या शेतीची माहिती मिळावी व शेतकऱ्याची आर्थिकस्थिती मजबूत व्हावी  याचा विचार करून हे प्रदर्शन मोहोळ येथे घेण्यात आले आहे.
                       या कृषी प्रदर्शनात कृषी विषयक नवनवीन संक्रित बी बियाणे,संक्रित फळे,फुले व शोभेच्या झाडांची रोपे, शिवाय शेतीची वेगवेगळी आत्याधूनिक औजारे,सेंद्रिय शेती,कुक्कुटपालन,शेळीपालन,
मुक्त गोठा पद्धत,सौर ऊर्जा,वेगवेगळे ट्रॅक्टर अशा अनेक वस्तूच्या स्टॉल्सचा सहभाग असणार आहे.शिवाय महिला बचत गटांनाही विषेश प्राधान्याने सहभाग दिला जाणार आहे.
           तसेच लहान मुलांसाठी खास आनंद यात्रेचेही आयोजन करण्यात आले असल्याची माहिती या प्रदर्शनाचे पोस्टरचे आनावरण करताना बारसकर यांनी सांगितले
          यावेळी ज्योती क्रांती परिषदेचे प्रदेश प्रवक्ते शिलवंत क्षिरसागर,सिमा कल्याणकर मॅडम,म्हाका कांबळे,पांड़ूरंग अनुसे,आक्रम शेख इ उपस्थित होते..

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages