Hot Posts

6/recent/ticker-posts

धैर्यशील मोहिते-पाटील व शीतल देवी मोहिते-पाटील यांच्या हस्ते अकलाई देवस्थान येथे निवारा शेड बांधकामाचे भूमिपूजन

धैर्यशील मोहिते-पाटील व शीतल देवी मोहिते-पाटील यांच्या हस्ते अकलाई देवस्थान येथे निवारा शेड बांधकामाचे भूमिपूजन

अकलूज( विलास गायकवाड) सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातील सर्वगुणसंपन्न युवा नेतृत्व धैर्यशील मोहिते-पाटील व जि प सदस्य शीतल देवी धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते अकलाई मंदिर देवस्थान परिसरात तीर्थक्षेत्र आराखडा निधीतून बांधण्यात येणाऱ्या निवारा शेडच्या बांधकामाचे भूमिपूजन नुकतेच  संपन्न झाले . यावेळी अकलूज ग्रामपंचायतीचे ज्येष्ठ सदस्य किशोरसिंह माने पाटील, उपसरपंच धनंजय देशमुख, तात्यासाहेब आसबे, सदस्य सुभद्रा वाईकर , कविता काशीद, बाळासाहेब सणस, ग्रामपंचायतीचे वरिष्ठ अधिकारी बाळासाहेब वाईकर , माजी सदस्य दादासाहेब तांबोळी आदी उपस्थित होते.
          नीरा नदीच्या काठावर शेकडो वर्षापासून वसलेल्या अकलाई मातेचे मंदिर हे समस्त आकलुज करांचे श्रद्धास्थान आहे. मागील काही वर्षापूर्वी अल्पशा जागेत काही पत्राच्या सेडमध्ये हे श्रद्धास्थान होते. कालांतराने राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूजचे माजी  सरपंच व शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांच्या कल्पकतेने मंदिराची उभारणी कोरीव दगडी बांधकामात करण्यात आली. अत्यंत आकर्षक आणि भव्यदिव्य मंदिराची उभारणी झाली तर कालांतराने मंदिराचा परिसर निसर्गरम्य असा करण्यात आला. मंदिराच्या समोरच भली मोठी दगडी दीपमाळ , आकर्षक प्रवेशद्वार , मंदिराच्या मागील बाजूस काही अंतरावर शिवसृष्टी हे भक्तगणांना प्रभावित करीत आहे. साडेतीन शक्तीपीठा नंतर आवर्जून अकलाई मातेच्या दर्शनासाठी व मंदिर पाहण्यासाठी भक्तगणांची सतत वर्दळ येथे असते . नित्यनेमाने चालणारी देवीची पूजाअर्चा, आराधना, नवरात्रीचा महाउत्सव यावेळीची आकर्षक आणि नयनरम्य विद्युत रोषणाई ही प्रभावी ठरते .तर दरवर्षी प्रथेप्रमाणे अकलाई मातेची यात्रा भंडारा मिरवणूक हा भक्तगण यासाठी आणि  ग्रामस्थांसाठी उत्सुकतेचा विषय असतो  यामुळे "अकलाई माझी नवसाची " हा मराठी चित्रपट अकलाई देवी वरती निघाला होता. तर अनेकांनी अकलाई देवी वरती गाणे गाण्यांचे ऑडिओ कॅसेट काढले आहेत तर अनेकदा या मंदिराच्या परिसरात विविध चित्रपटांचे चित्रीकरण करण्यात आले आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments