शिवरत्न तर्फे आयोजित मुला-मुलींसाठी उन्हाळी कुस्ती प्रशिक्षण शिबिर संपन्न
अकलूज (कटूसत्य वृत्त):- अकलूज येथील शिवरत्न शिक्षण संस्थेच्या ताराराणी महिला कुस्ती प्रशिक्षण केंद्र व शिवरत्न कुस्ती केंद्रातर्फे १ मे ते ३१ मे या कालावधीत मुला-मुलींसाठी उन्हाळी कुस्ती प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ३१ मुली आणि ४८ मुले यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्रशिक्षण कालावधी संपल्यानंतर शिवरत्न शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सौ. शितलदेवी मोहिते-पाटील यांच्या हस्ते सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आणि शिबिराची सांगता करण्यात आली.
या प्रसंगी शितलदेवी मोहिते-पाटील म्हणाल्या की, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या
मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील कुस्तीगीर मुले व मुलींना बौद्धिक, तांत्रिक तसेच आधुनिक कुस्तीतील नवीन डाव, नियम व आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण मिळावे यासाठी हे केंद्र उभारण्यात आले आहे.ताराराणी महिला कुस्ती केंद्र व शिवरत्न कुस्ती केंद्रात सहभागींना फ्री स्टाईल, ग्रीको-रोमन, भारतीय शैलीतील मॅट कुस्ती, तसेच योगा व प्राणायामाचे प्रशिक्षण नियमित दिले जाते.
शिबिराच्या सांगता समारंभाला सचिव धर्मराज दगडे, अनिल जाधव, नितीन बनकर, श्रीकांत राऊत, दत्तात्रय लीके, राहुल जगताप, रामकृष्ण काटकर, काकासाहेब जगदाळे, राहुल कोडक, सतपाल सिंह, सुहास तरंगे, अश्रफ शेख,बाळासाहेब रणवरे व इतर मान्यवर उपस्थित होते.
0 Comments