शासनाच्या वतीने शिवराज्याभिषेकची 6 जून हीच तारीख जाहीर करावी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 4, 2025

शासनाच्या वतीने शिवराज्याभिषेकची 6 जून हीच तारीख जाहीर करावी

 शासनाच्या वतीने शिवराज्याभिषेकची 6 जून हीच तारीख जाहीर करावी



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- 6 जून रोजी किल्ले रायगडावर लाखोंच्या शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो पण शासनाने तिथीनुसार राज्याभिषेक साजरा करण्याबाबतचे परिपत्रक रद्द करून सहा जून रोजीच शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात यावा असे नव्याने परिपत्रक काढावेत तसेच सहा जून हा शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यात यावेत या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले

छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके 1596  म्हणजेच 6 जून 1674 ला स्वतःस राज्याभिषेक करून घेतला आणि एका सार्वभौम राज्याच्या जयघोष केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा अत्यंत व्यापक आणि भारताच्या इतिहासातील एक  अत्यंत महत्वाचा प्रसंग होता. हा दिवस स्वराज्याची सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारी शासनाने एक समिती नेमून एकच तारीख जाहीर केली होती त्याच धर्तीवर इतिहास अभ्यासकांची समिती स्थापन करून 6 जून आज दिवस राज्याभिषेक जीवन दिवस म्हणून जाहीर करावा तात्कालीन शासनाने
3 जून 2021 च्या शासन निर्णयानुसार सहा जून हा दिवस सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे दरवर्षी सहा जून रोजी किल्ले रायगडावर 18 पगड जाती धर्मातील शिवभक्त यांच्या लाखोंच्या संख्येने हा उत्सव साजरा केला जातो याला वरचेवर व्यापक स्वरुप येऊन हा उत्सव लोकोत्सव बनला आहे असे असताना शासनाने 2 सप्टेंबर 24 रोजी तिथीनुसार राज्याभिषेक साजरा करण्यासाठी पाच कोटीचा निधी अर्थसंकल्प उपलब्ध करून देण्याचा चुकीचा निर्णय घेतला आहे लोक भावनेच्या विचार करून शासनाने त्वरित हा शासन आदेश रद्द करून नव्याने 6 जून रोजीच राज्याभिषेक साजरा करण्याचे परिपत्रक काढावे व अजूनही काही शासकीय निम शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय शाळा महाविद्यालय मध्ये हा दिवस साजरा केला जात नाही त्यातून शासनाच्या निर्णयाचा अवमान करणाऱ्या संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शाम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मीनलताई दास शहराध्यक्ष शिरीष जगदाळे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप निंबाळकर जिल्हा संघटक लखन पारसे सचिव महिला जयश्री जाधव जिल्हा सचिव सिद्धाराम सावळे शहर सचिव सतीश वावरे अरविंद शेळके विशाल शहापुरे शेखर कंटेकर राज स्वामी रमेश भंडारे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages