हिप्परगा तलाव 80 टक्के भरले नागरिकांना सतर्कतेचा ईशारा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 4, 2025

हिप्परगा तलाव 80 टक्के भरले नागरिकांना सतर्कतेचा ईशारा

 हिप्परगा तलाव 80 टक्के भरले नागरिकांना सतर्कतेचा ईशारा



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- गेल्या 15 दिवसांपासून तुळजापूर तालुका, उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील काही गावात तुफान पाऊस पडू लागल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह मध्यम प्रकल्प एकरूख  (ता. उत्तर सोलापूर)हिप्परगा तलावात येत असून, आजमितीस हा प्रकल्प 80 टक्केच्यावर भरला आहे. दरम्यान, वरील पाण्याचा प्रवाह असाच चालू राहिल्यास सांडव्यातून येणारे पाणी शहरातील काही सखल भागात जमा होण्याची भीती आहे. यामुळे पाटबंधारे विभागाकडून सोलापूर शहर व परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी, काटगाव, पिंपळा खु., पिंपळा बु., देवकुरळी, सुरतगाव, माळुंब्रा, सांगवी, वडगाव आदी भागात तुफान पाऊस पडत असल्याने त्या भागातील सर्व साठवण तलाव भरून सांडवे वाहत आहेत. याच बरोबर उतर व दक्षिण सोलापूर तालुक्यातील मार्डी, होनसळ, राळेरास, उळेगाव, गंगेवाडी, कासेगाव आदी ठिकाणीही मुसळधार होत असल्याने या भागातूनही मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग हिप्परगा तलावात होत आहे. यामुळे हा प्रकल्प 100 टक्के भरुन याचा विसर्ग दोन्ही सांडव्याद्वारे अनियंत्रित प्रवाह होवून शहर आणि परिसरातील सखल भागात म्हणजेच अवंतनगर, वसंत विहार व गुलमोहर अपार्टमेंटमध्ये पाणी जमा होण्याची शक्यता आहे. तसेच जुना तुळजापूर नाका, ते तळे हिप्परगा रस्ता, परूल गार्डन ते पोपल वस्ती परिसर, जुना कारंबा नाका ते भोगाव बार्शी रोड, तसेच काही रस्ते व वाहतुकीचे पूल देखील पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. तरी याबाबत नागरिकांना सतर्कतेचा इशारा आज (दि. 30) रोजी एका निवेदनाद्वारे पाटबंधारे विभागाच्या उपअभियंत्यांनी दिला आहे.
........................
तामलवाडीच्या दगडी पुलावरून पाणी
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी आणि पंचक्रोशीमध्ये गुरूवार, दि. 29 रोजी मध्यरात्री ढगफुटीसदृष्य पाऊस झाल्याने या भागातील सर्व साठवण, पाझर तलाव ओसंडून वाहत आहेत. लोकांच्या शेता-शेतात आज दिवसभर पाणीच दिसून आले. माळुंब्रा शिवारातील सांगवी साठवण तलावाचाही सांडवा सुटल्याचे सांगण्यात येते. यामुळे तामलवाडीच्या दगडी पुलावरून पाणी गुरूवारी दिवसभर वाहत होते. तामलवाडी आणि परिसरातील 8 ते 10 गावचे पाणी, तसेच उत्तर आणि दक्षिण सोलापुरातील काही गावांचे पाणी थेट एखरूख तलावात सध्या चालूच आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages