अकलूज येथे आढळले बेवारस प्रेत
अकलूज( प्रतिनिधी) सदुभाऊ चौक ते नविन बसस्थानक रोड लगत व हॉटेल ब्लु स्टार पासून काही अंतरावर रोडच्या कडेला झाडाखाली बेवारस पुरुष जातीच्या इसमाचे प्रेत आढळून आले आहे.
सदर अनोळखी इसमाचे नाव पत्ता माहीती नाही. त्याचे वर्णन - वय अंदाजे ४७ वर्ष,उंची ५ फुट ५ इंच, अंगाने सडपातळ, रंग निमगोरा, डोकीस काळे पांढरे केस वाढलेले,दाढी पांढरी वाढलेली, अंगात नेसणेस चॉकलेटी रंगाचे शर्ट व काळे रंगाची पॅन्ट व गळयात काळ्या रंगाची गोफ आहे. सदरचा इसम हा रोडचे बाजूस झाडाखाली चप्पल शिवण्याचे काम करत होता तरी वरील वर्णनाचे इसमांचे नातेवाईक कोणी असल्यास अकलुज पोलीस ठाणेस संपर्क करावे असे आवाहन अकलूज पोलीस ठाणेच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment