सामाजिक चित्रपट बनणे काळाची गरज - रमेश परदेशी
अकलूज ( विलास गायकवाड) सोलापूर जिल्हा हा ऊस उत्पादनासाठी प्रसिध्द असून, त्याला अनुसरून सांगोला येथील ऊसतोडणी कामगार बिराप्पा गावडे यांनी ऊस तोडणीतुन आलेला अनुभवाला अनुसरून ऊसतोडणी कामगारांच्या जीवनावर आधारित "बिंडा" या नवीन चित्रपटाचे लेखन केले आहे. तर या चित्रपटामध्ये प्रमुख कलाकार म्हणून मुळशी पॅटर्न प्रेम पिट्याभाई ( रमेश परदेशी) हे काम करत आहेत. यावेळी त्यांनी सांगितले की आपण चित्रपटात काम करताना ऊस तोडणी कामगारांच्या व्यथा अनुभवत आहोत. त्यांना होणारा त्रास, त्यांचे दुःख न सांगण्यापलीकडील आहे. तर काम करत असताना मला अतिशय दुःख होत आहे की त्यांना अतिशय वाईट हाल काढावे लागतात असे त्यांनी सांगितले.
चित्रपटाच्या छायांकन कासुरडी ( पुणे ) येथे चालू असून या
चित्रपटाला लातूर येथील विशाल क्षिरसागर यांच्या श्री लक्ष्मी एंटरटेनमेंट पुणे या निर्मिती संस्थे मार्फत तयार करण्यात येत आहे .
यामध्ये अकलूज व पुणे परिसरातील कलाकार काम करत आहेत . या चित्रपटाचे दिग्दर्शन बिराप्पा गावडे करत असून या चित्रपमध्ये लागीर झालं जी प्रेम पूर्वा शिंदे , कुंकू झालं वैरी प्रेम तेजा देवकर तसेच अनुभवी कलाकार साईनाथ जावळकर , अकलूजचे अभिनेते मल्हारी गायकवाड व कृष्णा मगर तसेच , प्रसाद बिलोरे , वामन नलावडे , संतोष भोसले , सुरज कुळे , स्वप्नील दळवी , अतुल सातफळे , महादेव ताजव , सुरेखा काते , चेतना घोडके , पल्लवी ताजव , मानसी जोशी, आरती सर्वगोड आणि पृथ्वी सर्वगोड असे अनेक कलाकार काम करत आहेत.तर संपुर्ण चित्रपटाचे नियोजन रावसाहेब कांबळे व दादासाहेब खोसे करत आहेत .
अकलूज ( विलास गायकवाड) सोलापूर जिल्हा हा ऊस उत्पादनासाठी प्रसिध्द असून, त्याला अनुसरून सांगोला येथील ऊसतोडणी कामगार बिराप्पा गावडे यांनी ऊस तोडणीतुन आलेला अनुभवाला अनुसरून ऊसतोडणी कामगारांच्या जीवनावर आधारित "बिंडा" या नवीन चित्रपटाचे लेखन केले आहे. तर या चित्रपटामध्ये प्रमुख कलाकार म्हणून मुळशी पॅटर्न प्रेम पिट्याभाई ( रमेश परदेशी) हे काम करत आहेत. यावेळी त्यांनी सांगितले की आपण चित्रपटात काम करताना ऊस तोडणी कामगारांच्या व्यथा अनुभवत आहोत. त्यांना होणारा त्रास, त्यांचे दुःख न सांगण्यापलीकडील आहे. तर काम करत असताना मला अतिशय दुःख होत आहे की त्यांना अतिशय वाईट हाल काढावे लागतात असे त्यांनी सांगितले.
चित्रपटाच्या छायांकन कासुरडी ( पुणे ) येथे चालू असून या
यामध्ये अकलूज व पुणे परिसरातील कलाकार काम करत आहेत . या चित्रपटाचे दिग्दर्शन बिराप्पा गावडे करत असून या चित्रपमध्ये लागीर झालं जी प्रेम पूर्वा शिंदे , कुंकू झालं वैरी प्रेम तेजा देवकर तसेच अनुभवी कलाकार साईनाथ जावळकर , अकलूजचे अभिनेते मल्हारी गायकवाड व कृष्णा मगर तसेच , प्रसाद बिलोरे , वामन नलावडे , संतोष भोसले , सुरज कुळे , स्वप्नील दळवी , अतुल सातफळे , महादेव ताजव , सुरेखा काते , चेतना घोडके , पल्लवी ताजव , मानसी जोशी, आरती सर्वगोड आणि पृथ्वी सर्वगोड असे अनेक कलाकार काम करत आहेत.तर संपुर्ण चित्रपटाचे नियोजन रावसाहेब कांबळे व दादासाहेब खोसे करत आहेत .

No comments:
Post a Comment