शंकरराव मोहिते महाविद्यालयातील खेळाडूंची विभागीय अंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धेसाठी निवड - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, November 20, 2019

शंकरराव मोहिते महाविद्यालयातील खेळाडूंची विभागीय अंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धेसाठी निवड

  शंकरराव मोहिते महाविद्यालयातील खेळाडूंची विभागीय अंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धेसाठी निवड   


    अकलूज { प्रतिनिधी } - अकलूज येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयातील  योगेश शेंडगे , सुधीर हुजरे ओंकार सपकाळ या खेळाडूंची कोठा विद्यापीठ, कोठा (राजस्थान) येथे दिनांक १८ ते २२ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत होणाऱ्या अखिल भारतीय पश्‍चिम विभागीय आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धेसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संघात निवड झाली आहे.
तसेच महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागाकडील मुजफ्फर पठाण यांची राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली आहे.त्याचबरोबर  विशाल बाबर याची राज्यस्तरीय हातोडा फेक स्पर्धेसाठी,  शिवम तोरणे यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी व हार्दिक सूर्यवंशी, मयुर मध्येशिया, अजय तोटे व सुमित डीसले यांची ४ बाय १०० (४१००) राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या सर्व खेळाडूंचा शाल, फेटा, हार व श्रीफळ देऊन माजी उपमुख्यमंत्री व माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील जि. प. सदस्या स्वरुपाराणी मोहिते पाटील यांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अाबासाहेब देशमुख पर्यवेक्षक प्रा. तानाजी मगर, क्रीडाशिक्षक अरविंद वाघमोडे, प्रा. दादासाहेब कोकाटे, प्रा. बाळासाहेब भोसले, प्रबंधक राजेंद्र बामणे इ. उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages