युवकामुळे मिळाला वृद्धाला ४ वर्षाने श्रावणबाळ योजनेचा लाभ
आढेगाव ते माढा हे ५० किलोमीटरचे अंतर असून वारंवार तालुक्याच्या ठिकाणी जाणे वृद्ध नागरिकाला शक्य नसल्याने व त्यातच आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने हताश झालेल्या ७३ वर्षीय सोपान चव्हाण यांनी गावातील सुशिक्षित व (कवी ) शरद पाटील यांच्याकडे धाव घेतली या युवकाने तातडीने तलाठी ते तहसील कार्यालयापर्यंत स्वखर्चाने पाठपुरावा केला व श्रावणबाळ योजनेचे प्रकरण मंजूर होईपर्यंत प्रयत्न केले. तब्बल चार वर्षाने प्रकरण मंजूर झाले आणि ३ महिन्याचे पैसे हातात मिळाल्यावर सोपान चव्हाण यांच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि त्यांनी शरद पाटील या युवकामुळे मला लाभ मिळाल्याची भावना व्यक्त केली.
टेंभुर्णी ( प्रतिनिधी ) माढा तालुक्यातील टेंभुर्णी जवळ असलेल्या आढेगांव येथील सोपान विठोबा चव्हाण या ७३ वर्षीय दारिद्र्य रेषेखालील जीवन जगणाऱ्या या ज्येष्ठ नागरिकाने श्रावणबाळ योजनेच्या लाभ मिळवण्यासाठी माढा तहसील कार्यालयाकडे २०१५ मध्ये अर्ज केल्यानंतर या वृद्धास तब्बल चार वर्षाने प्रेम कवी शरद पाटील या युवकाच्या प्रयत्नांमुळे लाभ मिळाला.
माढा तालुक्यातील आढेगांव येथील सोपान विठोबा चव्हाण यांचे दारिद्र्य रेषेखालील यादीत नाव असून त्यांनी तारीख १७ मार्च २०१५ रोजी माढा तहसील कार्यालयाकडे श्रावणबाळ योजनेखालील लाभ मिळवण्यासाठी अर्ज करून रीतसर पोहोच घेतली. यानंतर त्यांनी ४ वर्षात माढा तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात हेलपाटे मारले परंतु त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन माघारी पाठवले जायचे. यानंतर त्यांनी आपले गाऱ्हाणे गाव पुढाऱ्यांनापुढे मांडले परंतु त्यांच्याकडूनही आश्वासनाशिवाय त्यांना काहीच मिळाले नाही.आढेगाव ते माढा हे ५० किलोमीटरचे अंतर असून वारंवार तालुक्याच्या ठिकाणी जाणे वृद्ध नागरिकाला शक्य नसल्याने व त्यातच आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने हताश झालेल्या ७३ वर्षीय सोपान चव्हाण यांनी गावातील सुशिक्षित व (कवी ) शरद पाटील यांच्याकडे धाव घेतली या युवकाने तातडीने तलाठी ते तहसील कार्यालयापर्यंत स्वखर्चाने पाठपुरावा केला व श्रावणबाळ योजनेचे प्रकरण मंजूर होईपर्यंत प्रयत्न केले. तब्बल चार वर्षाने प्रकरण मंजूर झाले आणि ३ महिन्याचे पैसे हातात मिळाल्यावर सोपान चव्हाण यांच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि त्यांनी शरद पाटील या युवकामुळे मला लाभ मिळाल्याची भावना व्यक्त केली.


No comments:
Post a Comment