लुमेवाडी येथील सूफी हाजी हाफीज फत्तेह मोहम्मद जोधपुरी बाबा यांचा उरूस मंगळवार दिनांक १९ पासून सुरू
प्रतिनिधी-[अकलूज] माळशिरस व इंदापूर तालुक्याच्या सीमेवर असलेल्या लुमेवाडी येथील सूफी हाजी हाफीज फत्तेह मोहम्मद जोधपुरी बाबा यांचा उरूस मंगळवार दिनांक १९ पासून सुरू होणार असल्याची माहिती येथील दर्गा ट्रस्टचे अध्यक्ष हाजी उस्मान शेख यांनी दिली. या उरुसानिमित्त भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
सूफी हाजी हाफिज फत्तेह मोहम्मद जोधपुरी बाबा हे मूळ राजस्थान येथील जोधपूरचे होते. मात्र त्यांचे बहुतांश आयुष्य हे अकलूज व पंचक्रोशीमध्ये गेले होते. अकलूज येथील कमालभाई शेख यांच्या निवास्थानी त्यांचे वास्तव्य राहिले आहे. याच ठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. त्यानंतर लुमेवाडी येथे त्यांचा दफनविधी झाला होता. त्यामुळे अकलूज व लुमेवाडी या दोन्ही ठिकाणी त्यांचा उरूस भरविण्यात येतो. लुमेवाडी येथे जोधपुरी बाबांची विशाल दर्गा बांधण्यात आली आहे. याठिकाणी सोमवारी संदल चा कार्यक्रम संपन्न झाला. उद्या मंगळवारी उरुसाला प्रारंभ होणार आहे. बुधवारी जियारतचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. उरूसा दिवशी जश्ने कव्वालीचा कार्यक्रम
आयोजित करण्यात आला आहे. मुंबई येथील कव्वाल सुलतान नाझा व कर्नाटका येथील प्रसिद्ध कव्वाल हाजी मुराद आतिश हे कव्वालीचा कार्यक्रम सादर करणार आहेत. हा उरूस यशस्वी करण्यासाठी दर्गाह ट्रस्टचे अध्यक्ष हाजी उस्मान शेख, उपाध्यक्ष खुशालुद्दीन शेख, हिदायत शेख, कमाल जमादार ,शाबान सय्यद, शाहीरअल्ली शेख ,नूरमोहम्मद शेख, रमजान जमादार, सलीम शेख, जाऊद्दीन शेख, आयुब जमादार, मुस्तफा सय्यद, नजीर शेख, हुसेन शेख व लुमेवाडी मधील नागरिक विशेष श्रम घेत आहेत.
चौकट.. हाजी हाफीज फत्तेह मोहम्मद जोधपुरी बाबा यांची दर्गा हिंदू-मुस्लीम बांधवांचे तीर्थक्षेत्र म्हणून नावलौकिकास आलेले आहे. याठिकाणी प्रार्थनेसाठी पुणे ,सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील भक्तांची वर्दळ असते .त्यांच्या उरुसानिमित्त आलेल्या सर्व भाविकांच्या महाप्रसादाची चोख व्यवस्था केलेली असते. येथील कव्वालीचा कार्यक्रम बघण्यासाठी नागरिकांची आवर्जून उपस्थिती असते.

No comments:
Post a Comment