पंढरपुर - १७ गावातील आभार दौरा संपन्न .
मोहोळ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार यशवंत विठ्ठल माने हे विजयी झाले व त्यांना प्रचंड मताधिक्य मिळाले या यशाबद्दल मतदारसंघातील जनतेचे आभार मानण्यासाठी पंढरपूर तालुक्यातील सतरा गावचा आभार दौरा जिल्ह्याचे नेते आदरणीय राजनजी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उपस्थित पार पडला.
नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मोहोळ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला जे यश मिळाले या यशाबद्दल जनतेचे आभार माणने व सध्या असलेल्या ओला दुष्काळ,पंचनामे, रस्ते,पाणी,वीज व मूलभूत सुविधानबद्दल अडचणी जाणून घेणे या दृष्टिकोनातून आमदार यशवंत माने यांनी राजनजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली या दौऱ्याचे आयोजन केले होते.
या दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे,ज्येष्ठ नेते कल्याणराव युवा नेते भगीरथ भालके, टाकळी सिकंदर पंचायत समिती गणाचे सदस्य ज्ञानेश्वर चव्हाण,भिमाचे माजी संचालक शिवाजी चव्हाण, पांडुरंग ताटे, विद्यार्थी काँग्रेसचे संकेत ढवळे,गणेश बनसोडे सरचिटणीस प्रशांत बचुटे आदीजण उपस्थित होते.
यावेळी बोलताना राजनजी पाटील म्हणाले की पंढरपूर तालुक्यातील १७ गावं मतदारसंघात समाविष्ट झाल्यापासून नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी उभा राहत आलेली आहेत. आता विधानसभा निवडणुकीत पण ५४८० इतकं मोठं मताधिक्य इथल्या मतदारांनी दिलं. त्यामुळे प्रत्येक गावात जाऊन त्यांचे आभार व्यक्त करणे माझं कर्तव्य समजतो,दळणवळणाच्या दृष्टीने रस्ते विकास हा इथला प्रमुख प्रश्न आहे. आभार दौऱ्याच्या निमित्ताने मी आपणास आश्वस्त करतो की येत्या काळात आपले आमदार श्री.यशवंत माने यांच्या मार्फत १७ गावांना जोडणारा प्रत्येक रस्ता नव्याने तयार केला जाईल. आणि पुढील काही दिवसात विधिमंडळ स्थापन झाल्यावर आमदार महोदय त्या कामाच्या प्रक्रियेत सहभागी होतील, असा विश्वास यानिमित्ताने व्यक्त केला.
आपले मनोगत व्यक्त करताना नूतन आमदार यशवंत म्हणाले की या भागातील सर्व मतदारबंधूंचे मी मनापासून आभार मानतो की मी नवखा असून देखील राजनजी पाटील यांचे नेतृत्व शरद पवार साहेब यांच्या विचारांनवर विश्वास ठेवुन मला पण जे प्रचंड मताधिक्यी दिले त्याबद्दल मी आपला आभारी आहे,ऋणी आहे. या ऋणातून उतराई होणार नाही परंतु येणाऱ्या कालखंडामध्ये या भागातील जास्तीत जास्त प्रश्न सोडवून विकास कामे करून आपल्या भागाचा लौकीक वाढवण्याचे काम करेन अशी ग्वाही दिली.
पुळुज,शंकरगाव,नळी,आंबे,चळे,कोंढारकी,नेपतगाव,ओझेवाडी,तारापूर,खरसोळी,मगरवाडी,पुळूजवाडी, फुलचिचोली पोहरगाव विटे,आंबेचिंचोली सरकोली आदी भागातील लोकांनी प्रामुख्याने रस्त्याची अडचण सांगितले तसेच नदीच्या पलीकडील काही गावांमध्ये हे रस्त्याची सुविधा असली तरी स्मशानभूमी शाळा अंगणवाडी गटारी,सिमेंट रस्ते,छोटे पानंद रस्ते आदीबाबत मागणी यावेळी केली.
या दौऱ्यात विविध गावचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य सोसायटी चेअरमन कारखान्याचे संचालक विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment