२६/११ हल्ल्यातील शहीदनांना अभिवादन करण्यासाठी स्व. हाजी नुरमोहम्मद उस्मान रिक्षा स्टॅन्डच्यावतीने रक्तदान शिबीर
२६/११ मुंबई हल्ल्यातील शहीद पोलीस व जवानांना अभिवादन करण्यासाठी ससून प्रादेशिक रक्तपेढीच्या सहकार्याने स्व. हाजी नुरमोहम्मद उस्मान रिक्षा स्टॅन्डच्यावतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले . पुणे लष्कर भागातील कोहिनुर हॉटेल चौकात झालेल्या या रक्तदान शिबिरात ५० पिशव्या रक्तसंकलित करण्यात आले . तसेच शहीद जवानांना सायंकाळी मेणबत्त्या पेटवून आदरांजली वाहण्यात आली .
या रक्तदान शिबिराचे आयोजन हसन रंगरेज , मोहम्मद अली रंगरेज , तौफिक कुरेशी , मोहसीन शेख , शेर नूर मोहम्मद रंगरेज ,मोहसीन शेख आदींनी केले होते .
यावेळी पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे , रक्ताचे नाते ट्रस्टचे अध्यक्ष राम बांगड , विकास भांबुरे , राजेंद्र शहा , विजय भोसले , अशोक देशमुख , तन्वीर तांबोळी , वासिम कुरेशी , कुमार शिंदे , मन्सूर शेख , जावेद खान , गनी शेख , चंद्रशेखर मुळे ,व्हेनिस जॉर्ज , जलील परांडे आदी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी ससून प्रादेशिक रक्तपेढीचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ राजश्री चांदोडकर , समाजसेवा अधीक्षक शरद देसले , अरुण बर्डे , डॉ तेजल कुरापटी , डॉ गौरव देशमुख , परिचारिका मनिषा दिघे , प्रयोगशाळा तंत्रज्ञ ज्योती साळुंके , सहाय्यक ज्योतिराव गायकवाड ,सहाय्यक लाजर लक्कीपोगू , तंत्रज्ञान प्रथमेश लडकत , प्रतीक्षा भिलारे व राहुल धायगुडे आदीनि विशेष सहकार्य केले .

No comments:
Post a Comment