रक्तदान चळवळीला गती देण्याचे काम - पो.नि.राजेश गवळी
सांगोला (प्रतिनिधी):-देशहितासाठी स्वत:च्या प्राणाची आहुती देणार्या व्यक्तीला शहीद म्हणून ओळखले जाते. जगातील सगळ्यात मोठ्या त्यागाची ही आठवण शहीद या नावानेच होते.खरे तर प्रत्येकाने आपल्या मनात त्यांच्याविषयी आदर बाळगला पाहिजे. शहीद झालेल्या व देशासाठी प्राणपणाला लावणार्या प्रत्येकाची आठवण संपूर्ण आयुष्यभर ठेवणे गरजेचे आहे. शहीद अशोक कामटे सामाजिक संघटनेने रक्तदानाचे महत्त्व लक्षात घेवून शहराबरोबर ग्रामीण भागातही अधिकाधिक नागरिकांना रक्तदानास प्रवृत्त करुन रक्तदान चळवळीला गती देण्याचे काम या संघटनेने केल्याचे गौरवोद्गार सांगोला पोलिस स्टेशनचे पो.नि.राजेश गवळी यांनी सांगोला येथे आयोजित शहीद दिन कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस रक्तदान शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्षा सौ.राणीताई माने, नगरसेवक सुरेशआप्पा माळी, गजानन बनकर, शोभाकाकी घोंगडे, सतीशभाऊ सावंत, सेवानिवृत्त बी.एस.एङ्ग.जवान अमर लाटणे, आदर्श शिक्षण संस्थेचे संस्थाध्यक्षा श्रीमती कौशल्यादेवी शिंदे मॅडम, सौ.राजलक्ष्मी शिंदे, प्रमिला जगदाळे, दादासाहेब खडतरे, अरविंद केदार, आनंद घोंगडे, विलास पाटील सर, उद्योगपती गोविंद माळी, डॉ.प्रभाकर माळी, रेवनीलचे चेअरमन सोमेश यावलकर, यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना नगराध्यक्षा राणीताई माने म्हणाल्या, शहीदांच्या स्मृतीदिना निमित्त रक्तदान शिबिराचा उपक्रम स्तुत्य असून संघटनेने वेळोवेळी राबवलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच गजानन बनकर, दादासाो खडतरे, सेवानिवृत्त बी.एस.एङ्ग.जवान अमर लाटणे, आदि मान्यवरांनीी मनोगते व्यक्त करुन शहीदांना श्रध्दांजली समर्पित केली.
शहीद अशोक कामटे, हेमंत करकरे, विजय साळसकर, यांच्यासह सर्व शहीदांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करुन दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात १४१ रक्तदात्यांनी स्वयंस्ङ्गूर्तीने रक्तदान करुन शहीदांना श्रध्दांजली अर्पण केली.
शहीद दिनाचे औचित्य साधून बामणी येथील वीरपत्नी राणी खटके, सेवानिवृत्त बी.एस.एङ्ग.जवान अमर लाटणे, यांचा शहीद दिना निमित्त विशेष सत्कार करण्यात आला. शिबिरातील प्रत्येक रक्तदात्यास अशोक कामटे यांची प्रतिमा भेट देण्यात आली. रक्त संकलनासाठी रेवनील ब्लड बँक सांगोला येथील सर्व कर्मचार्यांचे सहकार्य लाभले.
शहीद दिन कार्यक्रम यशस्वीतेसाठी अध्यक्ष संतोष महिमकर, कार्याध्यक्ष अच्युत ङ्गुले, उपाध्यक्ष चैतन्य राऊत, मयुरेश गुरव, संदेश पलसे, ऍड.हर्षवर्धन चव्हाण, इंजि.चारुदत्त खडतरे, विठ्ठलपंत शिंदे सर, संदीप बनकर, ओंकार सपाटे, रविंद्र कुलकर्णी, ओंकार देशपांडे, नितीन कुंभार, अमर राऊत, अजित राऊत, आदि सदस्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन संस्थापक निलकंठ शिंदे सर यांनी केले.
No comments:
Post a Comment