राज्यस्तरीय वारकरी मेळाव्याचे आयोजन
अखिल भारतीय वारकरी मंडळ, सोलापूर यांच्यावतीने रविवार दि.१ डिसेंबर रोजी दुपारी १२.०० वाजता हुतात्मा स्मृती मंदिर, पार्क चौक, सोलापूर येथे ह.भ.प.प्रकाश महाराज बोधले (राष्ट्रीय अध्यक्ष) यांच्या अध्यक्षतेखाली व विभागीय अध्यक्षांच्या उपस्थितीत भव्य राज्यस्तरीय वारकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
वारकरी संप्रदायाची वाढ होण्यासाठी संप्रदायातील अडी अडचणी दूर करण्यासाठी संघटनात्मक विचार मंथन करण्यासाठी सर्व जिल्हाध्यक्षांची उपस्थिती राहणार आहे. कीर्तन परंपरे संबंधी प्रत्येक जिल्हा व तालुका स्तरावर प्रबोधन करण्यासाठी शिबिराच्या माध्यमातून जागृती करण्यास्तव चर्चा केली जाणार आहे. या मेळाव्यासाठी शहर व जिल्हा कार्यकारिणी परिश्रम घेत आहेत. अशी माहिती ह.भ.प.सुधाकर इंगळे महाराज (जिल्हाध्यक्ष) यांनी दिली.
या पत्रकार परिषदेत जोतीराम चांगभले (शहराध्यक्ष) संजय पवार (संपर्क प्रमुख), बळीराम जांभळे (जिल्हासचिव),किसन कापसे (कोषाध्यक्ष)मोहन शेळके,गणेश वारे,भाऊसाहेब बेलेरव,आदर्श इंगळे,पप्पू लिंबोळे,बजरंग डांगे,गुरुसिद्ध गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते .

No comments:
Post a Comment