सुजाण व सुसंस्कृत नागरिक बनवण्यासाठी खेळाची आवड आवश्यक - गटशिक्षणाधिकारी मारूती फडके.
माढा प्रतिनिधी--- भारताचे भावी नागरिक सुजाण आणि सुसंस्कृत बनण्यासाठी अंगी खिलाडूवृत्ती असणे आवश्यक आहे.यासाठी विद्यार्थी दशेपासूनच मुलांमध्ये खेळाची आवड निर्माण होण्यासाठीच पंचायत समिती शिक्षण विभागाच्यावतीने क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मारुती फडके यांनी सांगितले. माढ्यातील जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर शिक्षण विभागाच्या वतीने माढा बीटच्या प्राथमिक विभागाच्या क्रीडा स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी होते ते बोलत होते.
प्रारंभी शिक्षणाचे आद्य क्रांतिकारक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले यानंतर फडके यांचे हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले .
यावेळी विस्ताराधिकारी बंडू शिंदे केंद्रप्रमुख खातूनबी आतार विजय काळे विष्णू बोबडे प्रशालेचे मुख्याध्यापक उत्तम यादव बापू चौरे मुकुंद तांबिले प्रशालेचे क्रिडाशिक्षक दिलीप शिंदे व लक्ष्मण राऊत यांचेसह केंद्रातील सर्व मुख्याध्यापक शिक्षक आणि खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.माढा बीटमध्ये सहा केंद्राच्या वतीने आलेल्या संघांमध्ये कबड्डी खोखो लंगडी या सांघिक खेळासह बुद्धिबळ 100 मीटर 200 मीटर धावणे या वैयक्तिक खेळाच्या लहान गट आणि मोठा गटातून दोन विभागात या स्पर्धा घेण्यात आल्या .

No comments:
Post a Comment