बीटस्तरीय क्रीडा स्पर्धेत शेटफळ सुयश - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, November 30, 2019

बीटस्तरीय क्रीडा स्पर्धेत शेटफळ सुयश

बीटस्तरीय क्रीडा स्पर्धेत शेटफळ सुयश


क्रीडा संस्कृती वाढावी,विद्यार्थ्यांमधील क्रीडा कौशल्यांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने आज अनगर येथे पार पडलेल्या बीटस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये शेटफळ शाळेने सुयश संपादन केले आहे.
या क्रीडा स्पर्धांमध्ये खोखो,कबड्डी,लंगडी अशा सांघिक खेळां सोबत 100 मीटर धावणे,200 मीटर धावणे,बुद्धिबळ अशा वैयक्तिक स्पर्धाही पार पडल्या.यामध्ये जि.प.प्राथ.शेटफळ शाळेतून लहान गटातील मुलांनी कबड्डीमध्ये तर मोठ्या गटातील मुलींनी लंगडी मध्ये उपविजेतेपद प्राप्त केले.100 मीटर धावणे स्पर्धेमध्ये लहान गटातील मुलांमधून संज्योत कोळेकर तर मुलींमधून संयोगिता रावडे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.मोठ्या गटातील मुलांमधून रोहन वागज व मुलींमधून ऋतुजा राऊत यांनीही द्वितीय क्रमांक प्राप्त केला.200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत लहान गटातील मुलांमधून संजय कोळेकरने द्वितीय तर मुलींमधून वैष्णवी भांगे हिने प्रथम क्रमांक पटकावला.यासोबतच मोठ्या गटातील मुलींमधून ऋतुजा राऊत हिने द्वितीय क्रमांक मिळवला.बुद्धिबळ मध्ये लहान गटातील मुलींमधून श्रावणी लोंढे ही प्रथम आली.या सर्व विजयी स्पर्धकांचे तसेच मार्गदर्शक शिक्षक संगीता पाटील,सुरेखा मोरे,शशिकांत जाडकर,संतोष लोंढे,विठ्ठल पवार,सुवर्णा खडके,सरिता थोरात,माधवी जोशी,रजिया तांबोळी,तनुजा इंगळे,गणेश थोरात,मनीषा थोरात,रवींद्र देबडवार,मयूर गोनेकर,अर्चना पांडे यांचे गटशिक्षणाधिकारी सिद्धेश्वर निम्बर्गी, विस्ताराधिकारी विकास यादव, केंद्रप्रमुख विजय कांबळे, मुख्याध्यापिका उमा गुंड यांचेसह शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व व सर्व सदस्य यांनी अभिनंदन केले व विजेत्यांना तालुकास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages