कृषि विषयक कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांना समृद्धीयेईल ; रणजितसिंह शिंदे यांचे प्रतिपादन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, November 30, 2019

कृषि विषयक कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांना समृद्धीयेईल ; रणजितसिंह शिंदे यांचे प्रतिपादन

कृषि विषयक कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांना समृद्धीयेईल ; रणजितसिंह शिंदे यांचे प्रतिपादन


टेंभुर्णी :  ( प्रतिनिधी ) - सर्वच शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनास जाणे शक्य नसते यामुळे अशा टेंभुर्णी सारख्या शहरात रोटरी क्लबने आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनाचा परिसरातील शेतकऱ्यांना नक्की लाभ होईल.शासकीय सेमिनार मध्येही कृषी विषयक व्याख्यानाचे कार्यक्रम घेतल्यास शेतकऱ्यांत खरी समृद्धी येईल असे प्रतिपादन जि.प.सदस्य रणजितसिंह शिंदे यांनी केले.
           शुक्रवारी सकाळी  11 वा.  टेंभुर्णी येथे रोटरी क्लबच्या वतीने छोरिया टाऊनशीप येथे चार दिवसीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी उदघाटक म्हणून रणजितसिंह शिंदे बोलत होते.
                  यावेळी बोलताना जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार म्हणाले की,जेवढी हायटेक शेती तेवढी जास्त मेहनत घ्यावी लागते.कृषी प्रधान देश असल्याने शेतकरी वर्ग खूप मोठा आहे.व्यापक शेतीमुळे अशी कितीही मार्गदर्शन शिबिरे झाली तरीही मार्गदर्शन अपुरेच राहू शकते.यामुळे अशा उपक्रमाची गरज आहे ती रोटरी क्लबने पूर्ण केली आहे.असे उपक्रम शासनाच्या कृषी विभागाच्या दृष्टीने अभिमानास्पद गोष्ट आहे.सध्या नजर लागावी असे ज्वारीचे पीक उत्कृष्ठ आले आहे.समाज वर्गातील शेतकरी हा मोठा घटक असल्याने शेती विषयक प्रशिक्षणाची गरज आहे.
      तसेच शेतकऱ्यांनी शेतीबरोबर शेतीपूरक व्यवसाय करणे हेसुद्धा मुख्य शेती व्यवसाय केल्यासारखे आहे.जिल्ह्यातील शेती वैशिष्ठेपूर्ण असून स्थानिक बाजारपेठेत ४०-५० टक्के वाटा आपला आहे.चांगली क्वालिटी व प्रत यामुळे आपल्याकडील मालाला सर्वत्र पसंती व उठाव मिळतो.नुकसानीची आकडेवारी ठरविण्याची प्रचलित पद्धत बरोबर नसून ती कालानुरूप बदलायला हवी.सबसिडीचा विषय असला की,बाधित क्षेत्रात मोठी वाढ होते असे मत हि जिल्हा कृषी अधिकारी बसवराज बिराजदार यांनी मांडले.यासाठी यंत्रणेने जागरूकपणे काम करायला हवे असा सल्ला ही त्यांनी दिला.
          यावेळी टेंभुर्णी नेते  अँड कृष्णात बोबडे यांनीही मनोगत व्यक्त केले.
तीन शेतकऱ्यांना कृषी भूषण पुरस्कार : -
१)गाईच्या शेण-मूत्राचा उपयोग करून शेंद्रिय पद्धतीने निर्यातक्षम डाळींब उत्पादन केल्याबद्दल बेंबळे येथील देविदास अभिमान शिंदे
२)गीर गाईचा गोठा करून उत्कृष्ठपणे गोसंवर्धन केल्याबद्दल कन्हेरगाव येथील प्रसाद लिंबाजी मोरे
३)कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करून तो यशस्वी केला याबद्दल शेवरे येथील संतोष शिवाजी देखणे या तीन शेतकऱ्यांना कृषी पूरक व्यवसाय यशस्वीपणे केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी,प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
       कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी अध्यक्ष मुकुंद अटकळे यांनी केले.
कृषी प्रदर्शनात उत्कृष्ठ शेती उत्पादने,खते,बी बियाणे,औषधे,आधुनिक अवजारे ठेवली होती.जिल्हा बँकेने मायक्रो एटीएम सुविधा पुरविली आहे.
          कार्यक्रमास कृष्णात बोबडे,पी.डी.पाटील,तालुका कृषी अधिकारी दत्ता येळे,रोटरीचे अध्यक्ष मुकुंद अटकळे,सचिव सचिन होदाडे,राष्ट्रवादीचे  रमेश पाटील,  मार्केटकमीटीचे संचालक  दिलीप भोसले,तिसऱ्या आघाडीचे नेते रामभाऊ  शिंदे,श्री इव्हेंटचे ऋतुराज जवंजाळ,ऋषिकेश बोबडे,परमेश्वर खरात,संजय पाटील आदी मान्यवर,रोटरीचे सर्व पदाधिकारी,सदस्य,शेतकरी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages