NAAC कडून दत्तकला इन्स्टिट्यूशन्सला B++ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, June 10, 2025

NAAC कडून दत्तकला इन्स्टिट्यूशन्सला B++

NAAC कडून दत्तकला इन्स्टिट्यूशन्सला  B++

भिगवण (कटूसत्य वृत्त):-येथील दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स फॅकल्टी ऑफ इंजिनिअरींग व फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंटला भारतीय उच्च शिक्षण मूल्यांकन आणि मान्यता परिषदकडून NAAC B++ ग्रेड मिळाला आहे. संस्थेने आपल्या स्थानिक आणि राष्ट्रीय स्तरावर एक महत्त्वपूर्ण शैक्षणिक संस्था म्हणून ओळख निर्माण केली आहे, असे मत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांनी व्यक्त केले.

दत्तकला शिक्षण संस्थेने कालानुरूप शिक्षणाच्या पद्धतीमध्ये विविध सुधारणा केल्या आहेत. विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून समृद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. NAAC कडून आलेल्या टीमने संस्थेतील डिजिटल वर्ग खोल्या, सुसज्य प्रयोगशाळा, लॅब आणि उत्कृष्ट संगणक कक्ष, विविध शैक्षणिक क्षेत्रांतील पुस्तकं, जर्नल्स, ई-लायब्रेरी सेवा आणि संशोधनासाठी आवश्यक संसाधनं, विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसिक स्वस्थ मिळवण्यासाठी विविध क्रीडा सुविधा तसेच विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे, चांगली कॅन्टिन, वेलनेस सेंटर, करियर गाईडन्स आणि सर्वात महत्वाचे म्हणजे संस्थेने सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांसाठी जे विविध समाजसेवी उपक्रम केले आहेत. प्राचार्य डॉ. एस. ए. पाटील, प्रा. श्रीकांत साळुंके यांच्यासह प्राध्यापक कर्मचारी यांच्या परिश्रमामुळे संस्थेने यशस्वी वाटचाल केली आहे. यामुळे संस्थेचा विश्वास आणि प्रतिष्ठा वाढली आहे, असे संस्थेच्या सचिव माया झोळ यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages