चेक बाउन्स प्रकरणात ३ महिला कर्जदार यांना शिक्षा व दंड - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 9, 2025

चेक बाउन्स प्रकरणात ३ महिला कर्जदार यांना शिक्षा व दंड

 चेक बाउन्स प्रकरणात ३ महिला कर्जदार यांना शिक्षा व दंड



सोलापूर(कटूसत्य वृत्त):-चेक बाउन्स प्रकरणात ३ महिला कर्जदार यांना १ वर्षाचा कारावास (कैद ) आणि चेक रकमेचा दुप्पट रकमेचा भरण्याचे आदेश तसेच दुप्पट रक्कम न भरल्यास ६ महिने कैद असा आदेश सोलापूर येथील मे कोर्ट न्यायाधीश विनायक रेडेकर यांनी केला आहे.
सदर प्रकरण मधील थोडक्यात माहिती अशी कि, रेशमा ठोंबरे, कांचन ऐडगे, सुरेखा यनमुल यांनी जनकल्याण मल्टी स्टेट क्रेडीट को-आप सोसायटी, सोलापूर शाखाकडून कर्ज घेतले होते, सदर कर्जची रक्कम वेळेवर न फेड करता चालढकल केली, वसुली अधिकारी यांनी रक्कमसाठी तगादा लावल्याने त्यांनी चेक संस्थेच्या स्वाधीन केला, सदर चेक संस्थेच्या खाते मध्ये भरले असता तो चेक न वटता परत आला, वरील महिला यांना नोटीस देऊन देखील त्यांनी रक्कम दिली नाही, त्यामुळे संस्थेने वरील चेक रक्कम करीता मे. कोर्टत कलम १३८ नुसार दाद मागितली, सदर प्रकरणी सुनावणी होऊन, वरील महिला यांना दोषी ठरवून त्यांना १ वर्षाचा कारावास (कैद ) आणि चेक रकमेचा दुप्पट रकमेचा भरण्याचे आदेश तसेच दुप्पट रक्कम न भरल्यास ६ महिने कैद असा आदेश मे. कोर्टने केला आहे .सदर कामकाज फिर्यादी तर्फे अॅड. आनंद सागर यांनी काम पहिले .

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages