जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम
सोलापूर,(कटूसत्य वृत्त):-महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोलापूर शहर शाखेच्यावतीने गुरुवारी (ता. ५) मार्कंडेय उद्यानात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कण्हेरी, चाफा, जास्वंद यासह विविध प्रकारच्या २० वृक्षांची लागवड केली. हवामान बदल, वाढते प्रदूषण, नैसर्गिक आपत्ती आणि जैव विविधता जपणे या सर्व कारणास्तव वृक्ष संवर्धन अत्यंत गरजेचे आहे. म्हणून अंनिस फक्त विविध प्रकारच्या अंधश्रद्धांचे निर्मूलनच करते, असे नाही तर अनेक प्रकारचे सामाजिक व पर्यावरण पूरक उपक्रम राबवत असते. जसे की पीओपी गणपती न घेता शाडूची मूर्ती घ्या. होळीत लाकडे कमी प्रमाणात जाळून पोळी गरिबांना वाटा. फटाक्यांचे प्रदूषण करू नका. वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन करा, आदी उपक्रम राबविले जातात. या उपक्रमामध्ये लालनाथ चव्हाण, डॉ अस्मिता बालगावकर, ग्रंथमित्र कुंडलिक मोरे, विनीत जाधव, निशा भोसले, मधुरा सलवारू, लता ढेरे, शकुंतला सूर्यवंशी,सुनीता गायकवाड,ब्रह्मानंद धडके, विजय जाधव, अजय वाघमारे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments