Hot Posts

6/recent/ticker-posts

बाळ्याजवळील पाईपलाईन गळतीची १२ तासांत दुरुस्ती

 बाळ्याजवळील पाईपलाईन गळतीची १२ तासांत दुरुस्ती


सोलापूर (कटूसत्य वृत्त):-  सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उजनी - सोलापूर जलवाहिनीला मंगळवारी (दि. ३) रात्री उशिरा जंगली हॉटेलजवळ बाळे पुलाखाली गळती लागली. दुरुस्तीचे काम रात्री उशिरा हाती घेण्यात आले. त्यामुळे उजनी - सोलापूर जलवाहिनीवर शटडाऊन घेतले. पाणी उपसा बंद झाल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. बुधवारी (दि. ४) सकाळी पाणी उपसा सुरु झाला.


सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने मंगळवारी रात्री अदिला नदीमध्ये पिलर टाकण्याचे काम करत असताना महापालिकेच्या जलवाहिनीला जेसीबीचा धक्का लागल्याने पाईपलाईन फुटली. घटनेनंतर महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता तपन डंके घटनास्थळी गेले. रात्री नऊ वाजता जलवाहिनीवर शटडाऊन घेऊन पाईपलाईन बंद केली. रात्री उशिरा गळती दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले. १२ तास काम करत बुधवारी सकाळी नऊ वाजता दुरूस्तीचे काम पूर्ण केले.


चौकट 

सोलापुरातील या भागात आज होणार पाणीपुरवठा

झोन टाकी : बेडर पूल परिसर, सफाई कामगार वस्ती. उजनीलाईन - मरीआई चौक, दमाणी नगर, थोबडे वस्ती, थोबडे मळा, साठे-पाटील वस्ती, सेटलमेंट. भवानी पेठ : दयानंद कॉलेज टाकीवरुन घोंगडे वस्ती, धोत्रे वस्ती, भवानी पेठ, मदडी वस्ती, सातपुते वस्ती, कुर्बान हुसेन नगर, भारत नगर, पंचशील नगर, तक्षशील नगर, सिरत नगर, राहुल सोसायटी, सम्राट अशोक सोसायटी, लक्ष्मी विष्णू सोसायटी, लेप्रसी कॉलनी, मदर इंडिया झोपडपट्टी, संजय नगर, साईबाबा चौक, गीता नगर, कुचन नगर, हनुमान खड्डा परिसर, दाजी पेठ, सरगम हॉटेल परिसर, एकता नगर, कणिक नगर, बज्रेश्वर नगर, कित्तूर चन्नम्मा नगर, सवेरा नगर, संत तुकाराम नगर, साफल्या नगर, नरेंद्र नगर, सिद्धीविनायक नगर, साई बंगलो, टिळक नगर, नागनाथ नगर, किनारा हॉटेल परिसर, शहर भाग : अंत्रोळीकर नगर भाग एक, समाधान नगर, जवाहर नगर, जय जलाराम नगर, हरिकृष्ण अपार्टमेंट, तुलसी विहार, मंत्री चंडक पार्क, मुक्ती नगर, कोळी समाज सोसायटी, नाथ होम, बिलाल नगर, कांचनगंगा सोसायटी, स्वामी विवेकानंद नगर एक ते तीन, सवेरा नगर, वैष्णवी नगर एक व दोन, अण्णा कॉलनी, राम नारायण, चंडक नगर, नेहरू नगर टाकीवरून अमृत नगर, शांती नगर, अशोक नगर, निरापम सोसायटी, महालक्ष्मी नगर.

Reactions

Post a Comment

0 Comments