टेंभुर्णी येथे शहीद दिनानिमित्त वीर पत्नी सह माजी सैनिकांचा सन्मान - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, November 30, 2019

टेंभुर्णी येथे शहीद दिनानिमित्त वीर पत्नी सह माजी सैनिकांचा सन्मान

टेंभुर्णी येथे शहीद दिनानिमित्त वीर पत्नी सह माजी सैनिकांचा सन्मान 

टेंभुर्णी (प्रतिनिधी )  26 /11/2008  रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या शहीदांना विनम्र अभिवादन करुण या शहीद दिनानिमित्त शैक्षणिक सामाजिक कार्यातील उल्लेखनीय कामगीरी केलेल्या गुणवत्ता विद्यार्थी ,महीला कुस्ती विजेती समाजसेवक वीरमाता /वीरपत्नी व माजी सैनिकांनचा सन्मान सोहळा टेंभुर्णी येथिल गोविंद  वृध्द आश्रम देशमुख वस्ती आकलुज रोड येथे मंगळवारी सकाळी आकरा वाजता संपन्न झाला 
                           या कार्यक्रमाची सुरवात चव्हाणवाडीच्या भजन मंडळीनी टाळमुर्दुंगावाजऊन केली तर प्रथम प्रमुख पाहूण्या हस्ते शहीद जवानांच्या प्रतीमेची पुजा करुण दिपज्वलन करुण सुरवात केली .या कार्यक्रमाचे  प्रस्ताविक चेअरमन  नागेश पराडे-पाटिल यांनी केले .या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी कामधेनू परीवाराचे  ङाँ लक्ष्मण    आसबे  होते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे म्हणुन टेंभुर्णी पोलिसस्टेशनचे पी एस आय भोसले, होते तर प्रमुख उपस्थितीत  श्रीमती सुरेखाताई जाधव (विरपत्नी ) श्रीपुर, माजी चेअरमन संतोष खटके ,  जानताराजा मित्र मंडळाचे अध्यक्ष  सुधिर महाडीक ,टेंभुर्णी ग्रा.पं.सदस्य भाऊसाहेब महाडीक , पो.ङांगे पो ठावरे, कॕपटन माजीसैनिक   लक्षण माने पै सोमनाथ महाडीक ,माऊली महाडीक, चेअरमन पंडीत पराडे, शारदा गुरुकलच्या मॕडम प्रतिभा शिंदे ,विकास करळे, देशमुख सर,अधिकजन उपस्थितीत होते.
              या वेळी प्रमुख पाहूने म्हणुन बोलताना ङाँ आसबे म्हणाले की टेंभुर्णी च्या दशरथ बुवानी गोविंद वृध्दाश्रम 2002  पासुन  चालवून आज  या ठिकाणी  शहीद दिन साजरा करण्यासाठी विरपत्नी, माजी सैनिकांनचा व शैक्षणिक गुणवत्ता विद्यार्थी चा गुणगौरव करणे म्हणजे च शहीदांना खरी श्रद्धांजली असल्याचे म्हटले या वेळी गुणगौरव सोहळ्यात महाराष्ट्रामध्ये कुस्तीमध्ये तिसरा क्रमांक पटकावलेली विद्यार्थिनी तृप्ती नवनाथ जगदाळे,महाराष्ट्रामध्ये  विभागीय तिसरा क्रमांक पटकावणारी प्रियंका लालासाहेब पराडे -पाटील शारदा गुरुकुलचे  गुनवंत पाच विद्यार्थी सत्कार करण्यात आला , सनराईज इंग्लिश स्कुलची राधा व प्रतिक्षा डोके  यांचा ही करण्यात आला  आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्या बद्दल मराठा सेवा संघाचे   नागनाथ महाडीक सर ,यांचा सत्कार  करण्यात आला तर सोलापुर व पुणे जिल्ह्यातील माजी सैनिक पंकज मोहीते,  मेजर  श्याम कुमार भगवान साळुंखे,मधुकर लिंबाजी लोंढे,  ,हरिदास सोपान कदम,  कैलास बाबुराव गायकवाड, संजय कुमार नामदेव थोरात , गोरख दामु दळवी रा. माळीनगर ता. माळशिरस ,समाधान लक्ष्मण पवार माळीनगर, दगडू गुणाजी कुटे, विलास जाधव, गणेश शिंदे, जालिंदर शिंदे, व कृष्णा सटाले , विजय शिंदे माळीनगर,  तसेच श्रीपुरच्या  वीरपत्नी श्रीमती सुरेखाताई जाधव यांचा सत्कार करण्यात आला या वेळी 2002 पासुन गोविंद वृध्दाश्रम चांगल्या रितेने चालवल्या बद्दल  ह .भ .प. दशरथ बुवा देशमुख,यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे संयोजक भागवत रावसाहेब पराडे-पाटिल  बाभुळगाव  ता.माळशिरस  यांनी केले.
              हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ए ग्रुप बाभूळगाव मित्रमंडळाच्या वतीने परिश्रम घेण्यात आले तर कार्यक्रमाचे  आभार संभाजी पराडे -पाटील यांनी मानले तर सुत्रसंचालन राजु पाटील यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages