पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पुन्हा दिला बदल्यांचा दणका - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, November 30, 2019

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पुन्हा दिला बदल्यांचा दणका

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पुन्हा दिला बदल्यांचा दणका
सोलापूर : सोलापूर शहरातील नऊ पोलीस निरीक्षक ; सहा सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि दोन पोलीस उपनिरीक्षकांच्या पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी बदल्या केल्या आहेत. त्यामुळे सोलापूर शहर पोलीस खाते पुन्हा पोलीस आयुक्तांमुळे हादरून गेले आहे. सदर बझारचे पोलीस राजेंद्र बहिरट यांची विशेष शाखेला बदली केली असून त्यांच्या जागी एमएडीसीचे पोलीस निरीक्षकी बजरं साळुंखे यांची बदली केली आहे. विजापूर नाका पोलीस ठाण्याचे कैलास काळे यांची नियंत्रण शाखेला बदली केली असून कमलाकर पाटील हे आता विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक असतील. शिवाजी राऊत यांना जेलरोड पोलीस ठाणे दिले आहे. संतोष काणे यांना सुरक्षा शाखेवरून शहर वाहतूक शाखेवर बदलण्यात आले आहे. राजेंद्र करणकोट आता जोडभावी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक असतील. सूर्यकांत पाटील यांची विशेष शाखेतून एमआयडीसी  पोलीस ठाण्याला तर निवडणूक शाखेतील हेमंत शेंडगे यांची सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणून बदली केली आहे.
                  पोलीस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षातील सहायक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर यांना जेलरोड पोलीस ठाण्यात तर अमित शेटे याना विजापूर नाका पोलीस नियुक्त केले आहे. जीवन निरगुडे याना शहर वाहतूक शाखेत विजय पाटील यांना आर्थिक गुन्हे शाखेत आणि नितीन पेठकर यांना एमआयडीसी  पोलीस ठाण्यात नेमले आहे. जेलरोड पोलीस ठाण्याचे वैभव माली यांना शहर वाहतूक शाखेत पाठवण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक बालाजी मस्के यांना नियंत्रण कक्षातून विजापूर नाका पोलीस ठाण्यात नेमले आहे. पोलीस उपनिरीक्षक शशिकांत शिंदे यांना दंगा नियंत्रण पथकातून जेलरोड पोलीस ठाण्याला नेमले आहे.
पोलीस आयुक्त अकुंश शिंदे यांनी पुन्हा एकदा बदल्यांचा झटका दिल्यामुळे पोलीस खाते हादरून गेले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages