कै .प्रणव उर्फ आकाश उदय घोंगडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गरजू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप
( सांगोला प्रतिनिधी) - सांगोला विद्यामंदिर प्रशालेमध्ये प्रणव घोंगडे यांच्या 9 व्या स्मृतीप्रित्यर्थ गरजू विद्यार्थ्यांना आनंद घोंगडे व कीर्ती गारमेन्ट यांच्या वतीने 25 गणवेशांचे गणवेश वाटप करण्यात आले .संस्था सदस्य श्री विजयसिंह चव्हाण यांनी प्रणवच्या स्मृतींना उजाळा दिला. यावेळी व्यासपीठावर तानाजी काका पाटील (सांगोला शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष )तसेच अमर दादा लोखंडे , संस्था अध्यक्ष श्री पी .सी झपके सर संस्था कार्यकारणी सदस्य चं गु . अंकलगी सर,उदयोगपती आनंद घोंगडेउपस्थित होते .
यावेळी प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत प्राचार्य राजेंद्र घोंगडे यांनी केले. उपमुख्यापक पोपट चवरे, पर्यवेक्षक विजयकुमार कसबे भिमाशंकर पैलवान, वि.रा .पाटील सर्व शिक्षक विदयार्थी उपस्थित होते उपस्थितांचे आभार प्रदर्शन व या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभाग प्रमुख राजेंद्र ढोले यांनी काम पाहिले .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चैतन्य कांबळे यांनी केले.

No comments:
Post a Comment