विकास कामांच्या जोरावर जनता राष्ट्रवादीच्या पाठीशी ः बाळराजे पाटील - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, October 13, 2019

विकास कामांच्या जोरावर जनता राष्ट्रवादीच्या पाठीशी ः बाळराजे पाटील

मोहोळ,प्रतिनिधी
मोहोळ विधानसभा मतदारसंघांमध्ये लोकनेते शुगर चे चेअरमन बाळराजे पाटील यांचे झंझावाती प्रचारदौरे सुरू असून यांना जनतेतून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे.आज रविवारी सकाळी बाळराजे पाटील मुंढेवाडी येथे आयोजित केलेल्या प्रचार सभेला गर्दी केली होती.
यावेळी बोलताना बाळराजे पाटील म्हणाले की,मोहोळ तालुका हा लोकनेते बाबुराव अण्णा पाटील व शेतकऱ्यांचे जाणते राजे शरद पवार यांच्या विचारधारेला मानणारा असून यापूर्वी केलेल्या विकास कामाच्या जोरावर मोहोळ तालुक्यातील जनता ही राष्ट्रवादीच्या पाठीशी असून यापुढे तालुक्यातील उर्वरित विकासकामांचा डोंगर उभा करण्यासाठी तथा शरद पवार साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस,रिपाई,स्वाभिमानी शेतकरी संघटना या महाआघाडीच्या अधिकृत उमेदवार यशवंत विठ्ठल माने यांच्या घड्याळ चिन्हा समोरील बटन दाबून मतदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत रहावे असेही यावेळी बाळराजे पाटील यांनी सांगितले.
या प्रचार सभेस कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक शशिकांत पाटील,लोकनेते शुगर संचालक शुक्रार्चाय हावळे,सरपंच सचिन पाटील,मोहोन चौगुले,दत्तात्रय व्यवहारे,अभिमान व्यवहारे,संतोष डोंगरे,लहु व्यवहारे,रमेश चौगुले,संतोष व्यवहारे  आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages