शपथेवर सांगतो मतदार संघाचा कायापालट केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही ः क्षीरसागर
मोहोळ (प्रतिनिधी)
आपल्या मोहोळ विधानसभा मतदार संघाचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी मला विधानसभेत जाण्याची संधी द्या मी शपथेवर सांगतो मतदार संघाचा कायापालट केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. आपल्या भागामध्ये उच्च शिक्षणासाठी महाविद्यालये नाहीत मेडिकल कॉलेज नाहीत त्याचप्रमाणे तरुणांना बेरोजगारांच्या हाताला काम देण्याकरता याठिकाणी मोठी एमआयडीसी काढण्याचा संकल्प यानिमित्ताने मी केला आहे एक वेळ साखर कारखाना झाला नाही तरी चालेल पण आता फक्त समाजसेवाच करण्याचा माझा मानस आहे त्यामुळे माझ्या या शेवटच्या निवडणुकीत मला माघारी न पाठवता भरघोस मतांनी निवडून द्या असे मत महायुतीचे उमेदवार नागनाथ क्षीरसागर यांनी व्यक्त केले. विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या गाव भेट दौऱ्याप्रसंगी घोडेश्वर (बेगमपूर) येथील कॉर्नर सभेत क्षीरसागर बोलत होते.
यावेळी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघमारे, भाजपाचे नेते संजय क्षीरसागर, शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब पवार, शिवसेना तालुकाध्यक्ष चरणराज चवरे, भाजपा जिल्हा सरचिटणीस सतीश पाटील, युवासेना अध्यक्ष राजरत्न गायकवाड, भाजप युवा तालुकाध्यक्ष अजय कुडे, वाहतूक सेना तालुकाध्यक्ष सोमनाथ पवार, विद्यार्थी सेनेचे हर्षल देशमुख, बंडू तात्या गायकवाड, अनिस कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना क्षीरसागर म्हणाले की मी गेल्या वीस ते पंचवीस वर्षांमध्ये राजकारण करत असताना 20% राजकारण व 80 टक्के समाजकारण करत आलो आहे त्यामुळे आपल्याला सर्वच स्थरातून वाढता पाठिंबा मिळत आहे हे पाहून विरोधकाच्या ही पायाखालची वाळू घसरू लागली आहे त्यामुळे आधी केले आणि मग सांगितले या उक्तीप्रमाणे आगामी काळात माझ्या आश्वासनाची पूर्तता करण्याचे अभिवचन मी देत असल्याचे सांगत बाहेरून आयात करण्यात आलेल्या उमेदवारांना माघारी पाठवून मला निवडून द्यावे असे आवाहन शेवटी त्यांनी केले.
यावेळी शंकरराव वाघमारे म्हणाले की या मतदारसंघांमध्ये गेल्या पंचवीस वर्षात आपण एकदाही परिवर्तन घडवून अनु शकलो नाही. राज्यातील फडणवीस सरकारनेही या राज्यांमध्ये समाजाच्या प्रत्येक घटकांना समाधानी ठेवण्यासाठी अतिशय चांगले काम केले आहे केंद्रांमध्ये नरेंद्रभाई यांनी चांगलं काम केलं म्हणून पुन्हा एकदा तुम्ही त्यांना पाच वर्ष भाजपाला स्पष्ट बहुमत देऊन त्यांना पंतप्रधान केलं त्याचप्रमाणे आता राज्यात ही महायुतीचे सरकार येणार आहे त्यामुळे आपल्या मतदारसंघात विविध योजना खेचून आपला विकास साधण्यासाठी येथील बंडखोरांना घरचा रस्ता दाखवून नागनाथ क्षीरसागर यांना विधानसभेत पाठवावे.
यावेळी बोलताना शिवसेना तालुकाध्यक्ष चरणराज चवरे म्हणाले की शिवसेना हा सामान्यांच्या न्याय हक्कासाठी झगडणारी एक संघटना आहे उपेक्षित घटकांना शेतकऱ्यांवर अन्याय झाल्यानंतर पहिल्यांदा रस्त्यावर उतरणारा हा पक्ष आहे. आणि ह्या शिवसेनेच्या माध्यमातून आदित्य ठाकरे यांच्या रूपाने एक सच्चा सेवक आपल्याला मिळाला आहे त्यांनी आष्टी उपसा सिंचन संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्या योजनेचे काम मार्गी लावण्यासाठी संबंधित मंत्र्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून लागलीच त्या योजनेचा पाठपुरावा केला अशा संघटनेचा नेता आपल्या सोबत असताना आपल्याला घाबरण्याची गरज नाही वीस ते पंचवीस वर्षापासून भाजप-शिवसेना या पक्षाच्या माध्यमातून समाजामध्ये काम करत असताना तीन चार निवडणुका लढवणाऱ्या नागनाथ भाऊ सारख्या अनुभवी उमेदवाराला साथ देऊन त्यांना विधानसभेत पाठवा. यावेळी बिरुदेव व्होनमाणे, पंचाक्षरी स्वामी, हनुमंत कावळे, अनिल काकडे, नामदेव डांगे, मदन क्षीरसागर, अविनाश जमदाडे, सुभाष सरफळे, आदीसह पंचक्रोशीतील बहुसंख्य शिवसैनिक शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment