आमचं ठरलंय, ताई तुम्हालाच निवडून द्यायचं! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, October 13, 2019

आमचं ठरलंय, ताई तुम्हालाच निवडून द्यायचं!

 आमचं ठरलंय, ताई तुम्हालाच निवडून द्यायचं!
आ. प्रणितीताईं शिंदे यांच्या प्रभातफेरीत लोकांचा निर्धार



सोलापूर :- शहर मध्य मतदारसंघातील कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवार आ. प्रणितीताई शिंदे यांनी रविवारी काढलेल्या प्रभातफेरीला लोकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आमचं ठरलंय, ताई तुम्हालाच निवडून द्यायचं, या शब्दांत विविध स्तरातील लोकांनी यावेळी आपला निर्धार बोलून दाखविला.
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सर्वत्र सुरु आहे. उमेदवारांच्या पदयात्रा, कॉर्नर सभांना वेग आला आहे. यामध्ये आघाडीवर असलेल्या आ. प्रणितीताईंनी रविवारी आगळ्यावेगळ्या पद्धतीने प्रचार केला. त्यांनी प्रभातफेरी काढून सकाळी मॉर्निंग वॉक, जॉगिंग व योगासाठी निघालेल्या लोकांनी संवाद साधला. 
सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास अशोक चौकातील मार्कंडेय उद्यान येथून प्रभातफेरीची सुरुवात झाली. एवढच्या सकाळी प्रणितीताई उद्यानात आल्याचे पाहून उपस्थितांंना कुतुहूलमिश्रित आश्‍चर्य वाटले. उद्यानात वॉकिंग, जॉगिंग, योगा करणार्‍यांजवळ जात प्रणितीताईंनी स्वत:हून त्यांच्याशी संवाद साधला. लोकांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर प्रणितीताईंनी मी केलेल्या कामांच्या आधारावर मी तुमच्यासमोर मते मागण्यासाठी आले आहे असे सांगत तिसर्‍यांदा निवडून देण्याविषयी साद घातली. यावर लोकांनीही उत्स्फूर्तपणे आमचं ठरलंय, ताई तुम्हाला निवडून द्यायचं असे सांगत पाठिंबा दर्शविला. एका नागरिकाने ताई तुमच्यामुळे माझ्या आईच्या ऑपरेशनसाठी 50 हजारांची वैद्यकीय मदत मिळाली, असे सांगत कृतज्ञता व्यक्त केली. अनेक नागरिकांनी तुमच्यामुळेच आमच्या भागात विकास कामे झाल्याचे सांगत ताई तुम्ही निश्‍चिंत राहा, तुम्हाला निवडून देणार, असा निर्धार बोलून दाखविला. 
मार्कंडेय उद्यानानंतर विव्हको प्रोसेसमार्गे ही प्रभातफेरी कर्णिकनगरच्या चिल्ड्रन पार्कला पोहोचली. तिथेदेखील ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण, युवतींनी प्रणितीताईंनी संवाद साधला. याप्रसंगी अनेक गंमतीजंमतीही घडल्या. माजी उपमहापौर व भाजपचे कार्यकर्ते प्रवीण डोंगरे हे योगायोगाने तिथे आले असता प्रणितीताईंनी भाऊ तुमचा आशीर्वाद हवा आहे, असे विनम्रपणाने म्हटले. यावेळी उपस्थित सर्वच जण पक्षभेद विसरुन हास्यविनोदात रंगले. यानंतर प्रभातफेरी कर्णिकनगरातील जिजामाता उद्यानाकडे मार्गस्थ झाली. या उद्यानात आलेल्या लोकांशी संवाद साधल्यानंतर प्रणितीताईंनी कर्णिकनगरातील एका टपरीवर लोक व कार्यकर्त्यांसमवेत गप्पा मारत चहाचा आस्वादही घेतला. 
यानंतर फेरीच्या मार्गावरील लोकांशी संवाद साधत प्रणितीताई मतदानाचे आवाहन केले. गीतानगर, साईबाबा चौक, बोल्ली मंगल कार्यालय रोडमार्गे या फेरीचा अशोक चौकातील मस्तान हॉटेलजवळ समारोप झाला. या संवाद फेरी अनेक नागरिक पदाधिकारी, कार्यकर्ते फेरीत सहभागी झाले होते. 
दरम्यान पत्रकारांनी बोलताना आ. प्रणितीताई म्हणाल्या की, सकाळच्या वेळी वॉकींग, जॉगिंग, योगासाठी निघालेल्या लोकांच्या भेटीगाठी घेत साधला. त्यांच्या अडीअडचणींबरोबर त्यांचा निवडणुकीविषयी कलही जाणून घेतला. मी केलेल्या कामाच्या आधारे लोकांना मतदानाबाबत साकडे घातले. लोकांचा प्रतिसाद पाहता मी प्रत्येकाच्या घरी पोहोचल्याचे निदर्शनास आले. याशिवाय लोकांचा मला भरघोस पाठिंबा असल्याची खात्रीही पटली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages