लोकांचं भलं करण्याची हिम्मत या सरकार कडे नाही - आडम मास्तर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, October 13, 2019

लोकांचं भलं करण्याची हिम्मत या सरकार कडे नाही - आडम मास्तर

    लोकांचं भलं करण्याची हिम्मत या सरकार कडे नाही - आडम मास्तर



सोलापूर प्रतिनिधी-   आज महाराष्ट्र हवालदिल होताना दिसत आहे मात्र या गरीब कष्टकरी कामगारांसाठी सरकार काय केलं असं म्हणताना आडम म्हणाले की, आमदार खासदारांच्या मानधनात घसघशीत वाढ झाली पण या महाराष्ट्राच्या जनतेला फुटकी कवडी सुद्धा देऊ शकले नाही.वाढती महागाई, सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण, कामगार कपात यामुळे जनता जगणार की मरणार याचा तसूभरही विचार न करणारं या सरकार कडे लोकांचं भलं करण्याची हिम्मत नसल्याची टीका यावेळी केली.
शनिवार दिनांक 12 ऑक्टोबर रोजी  रात्री 8 वाजता   कुर्बान हुसेन नगर गुरुनानक चौक येथील कोपरा सभेत ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, कुर्बान हुसेन नगर हे शहराच्या मध्यवर्ती भागात असून एखाद्या अविकसित दुर्दम्य भागा सारखा दिसतो.रस्त्याच्या एका बाजूला श्रीमंताची  बंगले तर दुसऱ्या बाजूला हातावर पोट असणाऱ्या गोर गरिबांची वर्षानुवर्षे विकासापासून वंचित असणारी कुर्बान हुसेन झोपडपट्टी हा विरोधाभास महापालिकेच्या प्रशासनाला आणि स्थानिक आमदारांना का दिसत नाही हो म्हणत लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्नाला हात घेतले. 
माजी नगरसेविका नलिनीताई कलबुर्गी,युसूफ मेजर , दाऊद शेख,जावेद सगरी, रहीम नदाफ,विक्रम कलबुर्गी,हुसेन उर्फ  पटू,नरेश दुगाने,परवीन शेख,मुमताज शेख अँड सुनील पवार कासीम शेख,फय्याज शेख,सैफन बागवान,शंकर जाधव,खाजा भाई शेतसंदी, खाजभाई पटेल,रियाज दंडुवाले आदी उपस्थित होते.प्रसातविक युसूफ मेजर यांनी केले.
सूत्रसंचालन इलियास सिद्दीकी यांनी केले

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages