भगवान नगर चे वैभव आडम मास्तर मुळेच
त्या 54 पात्र लाभार्थ्यांना घर मिळवून देणारच ! आडम यांची ग्वाही*
सोलापूर प्रतिनिधी - भगवान नगर झोपडपट्टी तब्बल तीन वेळा जिल्हा प्रशासनाने आणि महानगर पालिकेने अतिक्रमण च्या जोरावर जबरदस्तीने हलवले.तत्कालीन जिल्हाधिकारी श्री जैन यांनी भर पावसाळ्यात झोपड्या उद्धवस्त केले.तरीही लोक चिखलात तसेच राहिले.यावेळी आडम मास्तरांनी संघर्ष करून राज्य सरकार मार्फत झोपडपट्टी घोषित करायला भाग पाडले.याठिकाणी पक्की घरे व्हावी म्हणून आमदारकीच्या काळात एकात्मिक गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत 9 कोटी रुपये महानगरपालिकेच्या तिजोरीत जमा केले.
शुक्रवार दिनांक 11 ऑक्टोबर रोजी सांय 6 वाजता भगवान नगर येथील कोपरा सभेत बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, लाभार्थ्यांना घरांचे वितरण करताना दुटप्पीपणा केल्यामुळे अजूनही 54 पात्र लाभार्थी घरांपासून वंचित आहेत त्यांना नोटीस देऊन त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला त्यावेळी तात्काळ मुंबई गाठून महापालिकेच्या कारवाईस मुख्यमंत्री च्या मार्फत कायमची स्थगिती मिळवून दिली.अजूनही याठिकाणी घसणाऱ्या पायऱ्या, पावसाळी गटारी असूनही गटारची समस्या कायम आहे. निकृष्ट दर्जाचे बांधकाम झालेले या समस्या निकाली काढणार भगवान नगर चे वैभव मिळवून देणार असल्याचे सांगितले.
यावेळी नगरसेविका नसीमा शेख म्हणाल्या की, भगवान नगरचे वैभव आडम मास्तर यांच्या मुळेच टिकले आहे.म्हणून यंदा आडम मास्तरांना विधानसभेत पाठवूया असा विश्वास दिले.
यावेळी सभेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर इरकल कॉ.आडम मास्तर व्यंकटेश कोंगारी नसिमा शेख,कामीनीताई आडम सुनंदा बल्ला, मुरलीधर सुंचू ,महादेव घोडके महमद अल्ली झिना महिबुब शेख प्रशांत म्याकल अनिल वासम अंबादास बिंगी गीता वासम एस पी गड्डम सरस्वती कामुर्ती आदी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment