राष्ट्रवादीचे उमेदवार श्री भारत भालके यांच्या प्रचारार्थ युवा नेते श्री भगिरथदादा भालके यांची पंढरपूर शहरात पदयात्रा..
पंढरपूर दि.11 - विधानसभा 2019 च्या निवडणुकीचे पंढरपूर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री भारत भालके यांच्या प्रचारार्थ सकाळी जुनीपेठ पोलीस चौकी परिसर- कळसे मारूती परिसर- वाघोली बिल्डींग परिसर- परीट गल्ली- हनुमान मैदान परिसर- मटण मार्केट परिसर- जुनीपेठ ते जय भवानी चौक परिसर- क्रांती चौक- कोळ्याचा मारूती परिसर- अंबिकानगर परिसर- बैलगोठा- लखुबाई परिसर- गुर्जरवाडा परिसर- गोविंदपूरा- उध्दवघाट परिसर- चिंचबन तालीम परिसर- माऊली मठाच्या समोरील परिसर इत्यादी ठिकाणी येथे युवा नेते श्री भगिरथदादा भालके यांनी पदयात्रा काढली.
सदर पदयात्रेदरम्यान श्री भगिरथदादा भालके यांचे स्वागत करण्यात आले. तसेच बर्याच ठिकाणी महिलांनी त्यांचे औक्षण केले. सदर पदयात्रेस नागरिकांचा उत्सफुर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
सदर पदयात्रेत राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी सर्वश्री बाबा अधटराव, सुभाषदादा भोसले, सुधीर भोसले, धनंजय कोताळकर, सायबू चौगुले, मामा फलटणकर, संजय भिंगे, महंमद उस्ताद, श्रीकांत शिंदे, अनिल अभंगराव, पांडुरंग पुणेकर, राजाभाऊ थोरात, संदीप पाटील, विजय काळे, प्रतापसिंह रजपूत, महेश मोटे, कैलास कारंडे, सोमा कोळी, सुरज पेंडाल, रशिद शेख, हाजीअकबर शेख, गुलाब मुलाणी, धनंजय लकडे, आदींसह परिसरातील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
No comments:
Post a Comment