मा क प च्या मध्यवर्ती कार्यालयाचे जल्लोषपूर्ण वातावरणात उद्घाटन !
सोलापूर प्रतिनिधी- सत्ताधारी आणि विरोधकांनी स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहराला खेडं बनवलं विकासाची फक्त चर्चा होत आहे मात्र कृती होताना दिसत नाही म्हणून या हुतात्मा नगरी च्या चौफेर विकासासोबत वाढत्या तरुणांच्या बेरोजगारी चा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मला विधानसभेत पाठवा असे आवाहन आडम यांनी केले.
मंगळवार दिनांक 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता दत्त नगर येथील माकप चे कार्यालय येथे उमेदवार संपर्क व प्रचार कार्यलयाचे उदघाटन माकप चे जिल्हा सचिव अँड एम एच शेख यांच्या अध्यक्षतेखाली जल्लोषात करण्यात आले.यावेळी समाजभूषण शंकर जाधव यांची प्रमुख उपस्थिती तर हणमंतू जंगम हे उद्घाटक होते.
आडम मास्तर बोलताना पुढे म्हणाले की,लोकांची संपत्ती वाढत आहे तर माझ्यावरील गुन्हे वाढत आहेत याचा मला अभिमान आहे. समाज माध्यमावर माझी बदनामी करणारे पोस्ट व्हायरल करीत आहेत.त्यांना माझं खुलं आव्हान आहे आम्ही सत्तेत नसताना ,लोकप्रतिनिधी नसताना जनतेसाठी अहोरात्र झटतो तुम्ही काय करत आहात?
यावेळी व्यासपीठावर अशोक इंदापुरे, एम एस इरफान सर, गेनसिद्ध बिराजदार,रा गो म्हेत्रस,चनप्पा सावळगी, सलीम लोखंडवला,महादेव घोडके,गोपाळ गायकवाड, अशोक तांबोळु, महिबूब कुमठे,डी रमेश बाबू,मेहुल मुळे, रंगप्पा मरेड्डी,सिध्दपा कलशेट्टी, युसूफ मेजर,म.हानिफ सातखेड,व्यंकटेश कोंगारी,कुरमय्या म्हेत्रे,नासीमा शेख,शेवंताताई देशमुख,कामिनी आडम,नलिनीताई कलबुर्गी ,अनिल वासम आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन अनिल वासम यांनी केले.

No comments:
Post a Comment