एबी फॉर्म मिळाला तर ठीक नाही तर सोलापुर मध्य मधुन अपक्ष म्हणुन निवडणुक लढणारच : महेश कोठे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 4, 2019

एबी फॉर्म मिळाला तर ठीक नाही तर सोलापुर मध्य मधुन अपक्ष म्हणुन निवडणुक लढणारच : महेश कोठे

एबी फॉर्म मिळाला तर ठीक नाही तर सोलापुर मध्य मधुन अपक्ष म्हणुन निवडणुक लढणारच : महेश कोठे


कोठे समर्थकांच्या बैठकीत घेतला निर्णय
मनोज शेजवाल यांनीही तानाजी सावंतावर घणाघाती टीका..

सोलापूर  शहरात शिवसेना वाढल्याने ज्यांची दुकानदारी बंद पडली त्या चांडाळ चौकडीने आपला विश्वास घात केला असून शिवसेनेकडून ए.बी. फॉर्म मिळाला तर ठीक नाही तर मी अपक्ष लढणारच, अशी भूमिका शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि इच्छुक उमेदवार महेश कोठे यांनी समर्थकांच्या बैठकीत व्यक्त केला.
सुशील रसिक सभागृहात पार पडलेल्या बैठकीत मोठ्या संख्येने कोठे समर्थक उपस्थित होते. यावेळी समर्थकांनी पक्षप्रमुखाचा आदेश न पाळता ए.बी. फाॅर्मची दलाली करणाऱ्या तानाजी सावतांचा निषेध व्यक्त करण्यात आला असून तानाजी सावंत यांनी शिवसेना खरेदी केली आहे का?, शिंदे यांच्याकडून पैसे घेऊन दिलीप माने यांना उमेदवारी दिली का? असा संतप्त सवाल उपस्थित करीत सावंत यांच्या कारभारावर समर्थकांनी आगपाखड व्यक्त केली.
यावेळी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांनी मातोश्रीवर घडलेला प्रकार सांगून कोठेंनी निवडणूक लढवावे, असे म्हंटले.
नगरसेवक अमोल शिंदे यांनी सेनेतल्या चांडाळ चौकडीने दिलीप माने कडून पैसे घेऊन उमेदवारी विकली असल्याचा आरोप केला.
या बैठकीत मोहोळ मध्ये बं
डखोरी केलेले मनोज शेजवाल यांनीही सावंतावर घणाघाती टीका करताना शहरातील शिवसैनिक म्हणून घेणाऱ्या दलालांनी शिवसेना वाढविण्याऐवजी संपवली असल्याचे,म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages