सोलापूर, - मतदान जनजागृती अभियान अंतर्गंत दि. १९ आॅक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता मानवी साखळी कार्यक्रम व सायकल रॅलीचे आयोजन करणेत आले असल्याची माहिती जिल्हा मतदान जनजागृती अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी दिली.
सोलापूर शहरातील चार हुतात्मा पुतळा येथे सायकल रॅलीचा शुभारंभ जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भोसले यांच्या हस्ते होणार आहे. तर इंदिरा गांधी स्टेडियम येथे सकाळी ८ वाजता मानवी साखळी चे आयोजन करणेत आले आहे. या ठिकाणी मतदान जनजागृती ची शपथ देण्यात येणार आहे.
या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे , उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, शिक्षणाधिकारी संजय राठोड, स्वीप समितीचे सदस्य सचिन जाधव, अविनाश गोडसे उपस्थित होते.
लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदानाचा अधिकार असलेल्या व्यक्तीने मतदान केले पाहिजे. सोलापूर जिल्हा व शहरात व्यापक प्रमाणात ही मोहिम राबविण्यात येत असल्याचे सांगून मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा मतदान जनजागृती अधिकारी प्रकाश वायचळ म्हणाले,
मतदान जागृती अभियान अंतर्गत विधान सभेच्या निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून या अभियानाचे आयोजन करणेत आले आहे. युवा मतदार यांनी देखील पुढे यावे. पहिले पवित्र मतदान करा. असेही आवाहन वायचळ यांनी केले आहे. सर्वांना वाहतुक नियंमांचे पालन करावे.
या उपक्रमांत शहरातील लायन्स क्लब ,रोटरी क्लब,चेंबर ऑफ कॉमर्स ,सर्व माध्यमिक शाळा,प्राथमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय,
महाविद्यालय,एनसीसी ,स्काऊट गाईड,एनएसएस ,सायकल असोसिएशन,मॉर्निंग वॉक ग्रुप,
योगा ग्रुप,सीनिअर सिटिझन्स ग्रुप,सर्व शासकीय,निम शासकीय,कर्मचारी,
सर्व टेक्सटाइल असोसिएशन,
सर्व प्रकारचे कारखान्यांचे कर्मचारी
असे सुमारे १०,००० कर्मचारी मानवी साखळी साठी उपस्थित राहणार आहेत.
दिनांक १९/१०/१९ रोजी सकाळी ७. ३० वाजता सायकल रॅलीस सुरूवात होणार आहे. चार हुतात्मा पुतळा येथून सायकल रॅलीचा शुभारंभ होणार आहे. तर इंदिरा गांधी स्टेडियम येथे सकाळी ८ वाजता मानवी साखळी होणार आहेत.
या प्रसंगी स्वीप समिती च्या सचिव चंचल पाटील यांनी सांगितले, सदर कार्यक्रमास जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, शहर पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, सोलापूर महानगर पालिकेचे आयुक्त दीपक तावरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ,सोलापूर विद्यापीठाचे कुलसचिव डाॅ. व्ही बी घुटे , जिल्हा पोलिस अधिक्षक (ग्रामीण ) मनोज पाटील , क्षेत्रीय प्रचार अधिकारी तथा स्वीप समिती सदस्य अंकुश चव्हाण, सहाय्यक जिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहल भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे , महापालिकेचा अतिरिक्त आयुक्त श्रीकांत मायकलवार, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सहभाग साठी श्री अशोक भांजे शिक्षण विस्तार अधिकारी दि प सोलापूर यांना
८६६८२६१३०९ या व्हॉट्स ऍप नंबर वर संपर्क साधावा. असे आवाहन करणेत आले आहे.
यामध्ये शहरातील सर्व महाविद्यालयातील रासेयोचे विद्यार्थी यांनी देखील सहभागी होण्यासाठी सोलापूर विद्यापीठ नियोजन करत आहे असेही शिक्षणाधिकारी संजय राठोड यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment