माढा-मतदार संघात,पक्षाची अस्मिता आणि उमेदवारांच्या अस्तित्वाची लढाई..तर..बबनराव शिंदे षटकार मारणार का? - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, October 17, 2019

माढा-मतदार संघात,पक्षाची अस्मिता आणि उमेदवारांच्या अस्तित्वाची लढाई..तर..बबनराव शिंदे षटकार मारणार का?

माढा-मतदार संघात,पक्षाची अस्मिता आणि उमेदवारांच्या अस्तित्वाची लढाई..तर..बबनराव शिंदे षटकार मारणार का?

कुर्डुवाडी (विजय चव्हाण) 245 माढा विधानसभा मतदारसंघात काॕर्नरसभा आणि गांवभेट दौऱ्यांनी उमेदवारांची चांगलीच दमछाक होताना दिसत आहे.
बबनराव शिंदे यांनी 1995 साली अपक्ष उमेदवारी घेऊन आमदार होण्याचा मान पटकावला नंतर राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर सलग वीस वर्ष आणि सुरूवातीचे पाच वर्षे असे सिल्व्हर ज्युबिली आमदार बबनराव शिंदे यंदा षटकार मारणार का?...येणारा काळच ठरवेल.
   तर नवखे उमेदवार संजय कोकाटे यांनी तीन वर्ष माढा तालुका भाजप पक्षाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले असून,त्यांनी घड्याळ्यासमोर हाती धनुष्यबाण घेऊन रिंगणात उडी मारली आहे.
राष्ट्रवादी-काँग्रेस तसेच जनसेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष पद भूषविलेले संजय कोकाटे यांनी मार्केट कमिटी आणि कै.विठ्ठलराव शिंदे कारखान्यावर सरकार नियुक्त तज्ज्ञ संचालक या पदावर नियुक्ती  झाल्यापासून,वेगवेगळ्या माहितीच्या आधारे विद्यमान आ.बबनराव शिंदे यांच्यावर नुसता शाब्दिक तोफगोळांचा सतत भडीमार सुरू ठेवून,सतत माढा तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळले होते. 
   आमदार-बबनराव शिंदे यांनी,कारखानदारीच्या माध्यमातून नेञरोग शिबिरे,सामुदायिक विवाह सोहळे,जेष्ठ नागरिकांना काशी याञा,माढा तालुक्यात 46 चारा छावण्या,सिना-माढा सिंचन योजना अश्या नानाविध   मार्गाने केलेल्या विकासकामांवर सभा होत आहेत. तर संजय कोकाटे यांच्या सभेला संधी साधूंसह विजयसिंह मोहिते-पाटिल यांच्या निष्ठावंत कांही जवळ राहिलेल्या कार्यकर्त्यांसह,भ्रष्टाचाराच्या मुद्यांवर  जोरदार घणाघाती आरोप-प्रत्यारोपांनी सभा गाजत आहेत.
 माढा तालुक्यात एवढी प्रचंड राजकीय उलथा-पालथ होऊन देखील,काही जुनी, जाणती, अनुभवी नेते-मंडळी अजूनही वेट अॕन्ड वाॕच या भुमिकेवर का ठाम आहेत....(कुणीही निवडून आले तरी, गुलाल आमचाच)हे एक कोडच म्हणावे लागेल.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages