दोघात तिसरा आता सगळं विसरा...244 करमाळा मतदारसंघात बदलाचे संकेत. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, October 17, 2019

दोघात तिसरा आता सगळं विसरा...244 करमाळा मतदारसंघात बदलाचे संकेत.

दोघात तिसरा आता सगळं विसरा...244 करमाळा मतदारसंघात बदलाचे संकेत.

कुर्डुवाडी-प्रतिनिधी(विजय चव्हाण) 244 करमाळा मतदारसंघ हा तिकिटासाठी वेगवेगळ्या पक्षात उमेदवारांनी उड्या मारलेला मतदारसंघ म्हणून जिल्हाभर नांव कमावलेला करमाळा तालुका होय..नुसत्या चर्चा,कार्यकर्ते-पदाधिकारी बैठक-मेळावा यांनी नुसता तोंडाला फेस आणून,वेगवेगळ्या चुली मांडून आपली दाळ ह्यावेळी तरी शिजेल म्हणून सारखा जाळ आणि धूर काढणारे,ञिकूट उमेदवार कोण कुणाची विकेट घेणार,आणि कोण-कोणते चांगले खेळाडू आपल्या संघात दाखल करायचे याची चढा-ओढीचा बहुचर्चित मतदारसंघ म्हणजेच करमाळा.
 घड्याळ सोडून धनुष्यबाण,भावाच्या अन् काकांच्या मदतीने ताणणा-या रश्मी बागल जुन्या काळातील आठवणींना उजाळा देत भावनिक साद घालताना दिसतात.
  तर नारायण पाटिल हे पाच वर्षात केलेली कामे जनतेसमोर मांडून,समाजाने आणि राजकीय गुरू मोहिते-पाटिल यांच्या सहकार्याने निवडून आल्याचे सांगून पाणीदार आमदार असल्याचे जनतेसमोर मांडतात.
  तर जि.प.अध्यक्ष संजयमामा शिंदे यांनी करमाळा मतसंघात दिलेला भरघोस निधी आणि विकासकामांवर प्रकाशझोत टाकून आपण जयवंत विजयी आमदार होणार असे गर्दी खेचणा-या सभेत सांगताना आढळतात..अनेक जणांनी हातात सफरचंद घेऊन निरोगी स्वास्थ्य कसे मिळते..याची अनेक उदाहरणे जाहिरसभेत दिली.. आता करमाळा मतदारसंघातील जनता जनार्धन सफरचंद खाऊन ताकदीने बाण ताणणार का? जोरानं शिट्टी फुंकणार हा येणारा काळचं ठरवेल.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages