मुळावर उठलेल्या दळभद्री व घोटाळेबाज सरकारला बाजूला सारा ः अजित पवार
नाच्यासारख्या उड्या मारणार्यांना धडा शिकवा
लोकसभेच्या निवडणुकीत निवडून न आल्याने काहीजण पक्ष सोडून गेले मात्र सुना नातवंडे आली असताना नाच्यासारख्या या पक्षातून त्या पक्षात उड्या मारल्या जात आहेत. सोडून गेलेल्या लोक पक्षाची झाले नाहीत ते लोकांचे काय होणार त्यामुळे अशा लोकांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे आणि जनता शिकवल्याशिवाय राहणार नाही असा टोला अजित पवार यांनी धनंजय महाडिक यांच्यासह राष्ट्रवादी सोडून गेलेल्यांना लगावला.
मोहोळ (विशेष प्रतिनिधी)ः शिवसेना -भाजप युती शासनाने शेतकर्यांची पाच वर्षात अत्यंत वाईट अवस्था केली आहे शेतकर्यांची क्रूर थट्टा केली असून त्यांची स्थिती हलाखीची झाली आहे.जातीवादी सरकार बाजूला करण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे.विमा कंपनीला गडगंज श्रीमंत करीत भाजप सरकार शेतकर्यांच्या मुळावर उठले आहे.लबाड बोलून सत्ता उपभोगताना सरकारला लाजच वाटत नाही.युतीच्या दळभद्री व घोटाळेबाज सरकारला बाजूला करण्याची वेळ आली आहे.जर आमचे सरकार आले तर तीन महिन्यात शेतकर्यांचा सातबारा कोरा करून दाखवणार असल्याचे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
मोहोळ तालुक्यातील पेनुर येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस,कॉंग्रेस,शेतकरी कामगार पक्ष व महाआघाडीचे अधिकृत उमेदवार यशवंत माने यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोपट देशमुख हे होते. यावेळी माजी आमदार राजन पाटील, राज्य सचिव प्रदिप गारडकर, जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, जि.प.सदस्य बाळराजे पाटील,विद्यार्थी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, कार्यकारी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील,तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, कार्याध्यक्ष संतोष पवार, मानाजी माने, विक्रांत माने, यशवंत माने,अस्लम चौधरी, गटनेते ज्ञानेश्वर चव्हाण,जि प सदस्य शिवाजी सोनवणे, शशिकांत पाटील, पप्पू पाटील, नागेश साठे,बालाजी लोहकरे,प्रदेश उपाध्यक्ष संकेत ढवळे,मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष गौरव खरात,कॉंग्रेसचे राजेश पवार, कॉंग्रेस सरचिटणीस किशोर पवार, राजकुमार सलगर, सिंधुताई वाघमारे, रमेश बारसकर, दीपक माळी, उद्योगपती यशवंत गुंड, जयवंत गुंड,शहराध्यक्षा यशोदा कांबळे उपस्थित होते.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, सत्ताधार्यांना सत्तेची नशा आली आहे. दारू विकणार्या
उमेदवारांना नीट वाचता येत नाही तर विधानसभेत शपथ काय घेणार..? असा सवाल त्यांनी विचारला. शेतकर्यांना हे सरकार साले म्हणतात.युतीचे सरकार हे दळभद्री असून शेतकर्यांना मातीत घालणारे आहे. पाच वर्षांमध्ये शेतकर्यांची अत्यंत वाईट अवस्था केली असून कर्जमाफीच्या नावाखाली तीन वर्षापासून शेतकर्यांची क्रूर थट्टा केली आहे. मोहोळ तालुक्यातील प्रलंबित प्रश्न पूर्ण शिरापूर उपसा सिंचन, सिना भोगावती नदीजोड प्रकल्प , तालुक्यासाठी एमआयडीसी त्याचप्रमाणे बारामती प्रमाणे तालुक्यात आहे विकास करणार असल्याचा शब्द यावेळी त्यांनी दिला.
राजन पाटील बोलताना म्हणाले की, उजनीच्या पाण्याचे नियोजन केले नसल्यामुळे दोन हजार कोटी रुपयांच्या पिकाचा फटका बसला.मोहोळची जनता पुरोगामी व स्वाभिमानी विचारांची असून यावेळेस राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मताधिक्य दिल्याशिवाय राहणार नाही. सरकार हे राष्ट्रवादीचेच होणार आणि सत्ता स्थापन करताना शपथपत्रावर केवळ मोहोळचा उमेदवारच सही करणार असे सांगितले.
राष्ट्रवादीत कुस्ती खेळायला कोणीही मल्ल शिल्लक नाही असे देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टिकेला उत्तर देण्यासाठी रमेश बारसकर यांनी यावेळी अजित पवार यांना गदा देऊन ‘‘अजित दादा हेच पैलवान’’ असतील असे माजी आमदार राजन पाटील सांगून त्यांचा सन्मान केला.
गेल्या पाच वर्षांमध्ये राज्यातील सामाजिक सलोखाही बिघडला असून सर्वच बाबतीत महाराष्ट्राचे खच्चीकरण करण्याचे काम प्रस्थापित सरकारने केलेले आहे. म्हणून शेतकरी, गरीब, कष्टकरी जनतेचे राज्य निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस शिवाय व पवार साहेबां शिवाय पर्याय नसल्याचे सूतोवाचही त्यांनी यावेळी केले याप्रसंगी मोहोळ तालुका धनगर समाज तर्फे राष्ट्रवादीच्या उमेदवार यशवंत माने यांना पाठिंबा चे पत्र देण्यात आले. अजित पवार यांचा सत्कार ढोल,काठी आणि घोंगड़े देऊन करण्यात आला.यावेळी धनाजी गावडे,भीमराव जरग,भाऊसाहेब सलगर,सज्जन पाटील,सदा कोकरे,देवीदास देवकते,राजाभाऊ सलगर,भागवत शिंदे,अंकुश माने आदि धनगर बांधव उपस्थित होते. यावेळी कॉंग्रेस मागासवर्गीय जिल्हाध्यक्ष गौरव खरात,सेवादल जिल्हाध्यक्ष राजेश पवार,शहराध्यक्ष किशोर पवार,उपाध्यक्ष राजाभाऊ पाटील,डीसीसी संचालक भारत सूतकर,प्रकाश कस्तूरे, हरिश्चंद्र चवरे,पप्पू पाटील,अस्लम चौधरी, सुरेश शिवपूजे,पांडुरंग ताठे,भीमा संचालक अनिल गवळी,दत्तात्रय सावंत,भाऊसाहेब सलगर,राहुल मोरे,दत्ता पवार, दत्ता सावंत,सज्जन पाटील,लतीफ़ तांबोली,दिग्विजय माने, चंद्रहार चव्हाण,शशिकांत पाटील,रामदास चवरे,सचिन चवरे,लक्ष्मण बोंबाळे,विकिराजे भोसले,आनंद माने,श्रीकांत शेंबड़े,सुदर्शन कादे,मुकेश बचुटे आदिसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नाच्यासारख्या उड्या मारणार्यांना धडा शिकवा
लोकसभेच्या निवडणुकीत निवडून न आल्याने काहीजण पक्ष सोडून गेले मात्र सुना नातवंडे आली असताना नाच्यासारख्या या पक्षातून त्या पक्षात उड्या मारल्या जात आहेत. सोडून गेलेल्या लोक पक्षाची झाले नाहीत ते लोकांचे काय होणार त्यामुळे अशा लोकांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे आणि जनता शिकवल्याशिवाय राहणार नाही असा टोला अजित पवार यांनी धनंजय महाडिक यांच्यासह राष्ट्रवादी सोडून गेलेल्यांना लगावला.मोहोळ (विशेष प्रतिनिधी)ः शिवसेना -भाजप युती शासनाने शेतकर्यांची पाच वर्षात अत्यंत वाईट अवस्था केली आहे शेतकर्यांची क्रूर थट्टा केली असून त्यांची स्थिती हलाखीची झाली आहे.जातीवादी सरकार बाजूला करण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे.विमा कंपनीला गडगंज श्रीमंत करीत भाजप सरकार शेतकर्यांच्या मुळावर उठले आहे.लबाड बोलून सत्ता उपभोगताना सरकारला लाजच वाटत नाही.युतीच्या दळभद्री व घोटाळेबाज सरकारला बाजूला करण्याची वेळ आली आहे.जर आमचे सरकार आले तर तीन महिन्यात शेतकर्यांचा सातबारा कोरा करून दाखवणार असल्याचे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
मोहोळ तालुक्यातील पेनुर येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस,कॉंग्रेस,शेतकरी कामगार पक्ष व महाआघाडीचे अधिकृत उमेदवार यशवंत माने यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोपट देशमुख हे होते. यावेळी माजी आमदार राजन पाटील, राज्य सचिव प्रदिप गारडकर, जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, जि.प.सदस्य बाळराजे पाटील,विद्यार्थी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, कार्यकारी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील,तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, कार्याध्यक्ष संतोष पवार, मानाजी माने, विक्रांत माने, यशवंत माने,अस्लम चौधरी, गटनेते ज्ञानेश्वर चव्हाण,जि प सदस्य शिवाजी सोनवणे, शशिकांत पाटील, पप्पू पाटील, नागेश साठे,बालाजी लोहकरे,प्रदेश उपाध्यक्ष संकेत ढवळे,मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष गौरव खरात,कॉंग्रेसचे राजेश पवार, कॉंग्रेस सरचिटणीस किशोर पवार, राजकुमार सलगर, सिंधुताई वाघमारे, रमेश बारसकर, दीपक माळी, उद्योगपती यशवंत गुंड, जयवंत गुंड,शहराध्यक्षा यशोदा कांबळे उपस्थित होते.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, सत्ताधार्यांना सत्तेची नशा आली आहे. दारू विकणार्या
उमेदवारांना नीट वाचता येत नाही तर विधानसभेत शपथ काय घेणार..? असा सवाल त्यांनी विचारला. शेतकर्यांना हे सरकार साले म्हणतात.युतीचे सरकार हे दळभद्री असून शेतकर्यांना मातीत घालणारे आहे. पाच वर्षांमध्ये शेतकर्यांची अत्यंत वाईट अवस्था केली असून कर्जमाफीच्या नावाखाली तीन वर्षापासून शेतकर्यांची क्रूर थट्टा केली आहे. मोहोळ तालुक्यातील प्रलंबित प्रश्न पूर्ण शिरापूर उपसा सिंचन, सिना भोगावती नदीजोड प्रकल्प , तालुक्यासाठी एमआयडीसी त्याचप्रमाणे बारामती प्रमाणे तालुक्यात आहे विकास करणार असल्याचा शब्द यावेळी त्यांनी दिला.
राजन पाटील बोलताना म्हणाले की, उजनीच्या पाण्याचे नियोजन केले नसल्यामुळे दोन हजार कोटी रुपयांच्या पिकाचा फटका बसला.मोहोळची जनता पुरोगामी व स्वाभिमानी विचारांची असून यावेळेस राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मताधिक्य दिल्याशिवाय राहणार नाही. सरकार हे राष्ट्रवादीचेच होणार आणि सत्ता स्थापन करताना शपथपत्रावर केवळ मोहोळचा उमेदवारच सही करणार असे सांगितले.
राष्ट्रवादीत कुस्ती खेळायला कोणीही मल्ल शिल्लक नाही असे देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टिकेला उत्तर देण्यासाठी रमेश बारसकर यांनी यावेळी अजित पवार यांना गदा देऊन ‘‘अजित दादा हेच पैलवान’’ असतील असे माजी आमदार राजन पाटील सांगून त्यांचा सन्मान केला.
गेल्या पाच वर्षांमध्ये राज्यातील सामाजिक सलोखाही बिघडला असून सर्वच बाबतीत महाराष्ट्राचे खच्चीकरण करण्याचे काम प्रस्थापित सरकारने केलेले आहे. म्हणून शेतकरी, गरीब, कष्टकरी जनतेचे राज्य निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस शिवाय व पवार साहेबां शिवाय पर्याय नसल्याचे सूतोवाचही त्यांनी यावेळी केले याप्रसंगी मोहोळ तालुका धनगर समाज तर्फे राष्ट्रवादीच्या उमेदवार यशवंत माने यांना पाठिंबा चे पत्र देण्यात आले. अजित पवार यांचा सत्कार ढोल,काठी आणि घोंगड़े देऊन करण्यात आला.यावेळी धनाजी गावडे,भीमराव जरग,भाऊसाहेब सलगर,सज्जन पाटील,सदा कोकरे,देवीदास देवकते,राजाभाऊ सलगर,भागवत शिंदे,अंकुश माने आदि धनगर बांधव उपस्थित होते. यावेळी कॉंग्रेस मागासवर्गीय जिल्हाध्यक्ष गौरव खरात,सेवादल जिल्हाध्यक्ष राजेश पवार,शहराध्यक्ष किशोर पवार,उपाध्यक्ष राजाभाऊ पाटील,डीसीसी संचालक भारत सूतकर,प्रकाश कस्तूरे, हरिश्चंद्र चवरे,पप्पू पाटील,अस्लम चौधरी, सुरेश शिवपूजे,पांडुरंग ताठे,भीमा संचालक अनिल गवळी,दत्तात्रय सावंत,भाऊसाहेब सलगर,राहुल मोरे,दत्ता पवार, दत्ता सावंत,सज्जन पाटील,लतीफ़ तांबोली,दिग्विजय माने, चंद्रहार चव्हाण,शशिकांत पाटील,रामदास चवरे,सचिन चवरे,लक्ष्मण बोंबाळे,विकिराजे भोसले,आनंद माने,श्रीकांत शेंबड़े,सुदर्शन कादे,मुकेश बचुटे आदिसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment