या निवडणूकतील लढाई जात,पात व धर्माविरोधातील ः आ.प्रणिती शिंदे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, October 17, 2019

या निवडणूकतील लढाई जात,पात व धर्माविरोधातील ः आ.प्रणिती शिंदे

सोलापूर (प्रतिनिधी)ः शहर मध्य मतदारसंघातील अनेक उमेदवार हे सत्ता, पदाच्या हव्यासापोटी निवडणूक लढवित आहेत. केवळ स्वत:च्या स्वार्थापोटी ते निवडणूक लढत असून, त्यांचे लोकांसाठी काहीच काम नाही, अशांना या निवडणुकीत जनतेने थारा देऊ नका, असे आवाहन कॉंग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केले. पाथरुट चौकातील मातंग वस्ती येथील कॉर्नर सभेत त्या बोलत होत्या.
यावेळी शंभू डुकरे, शांतीलाल साबळे, गणेश शिंदे, संजू साठे यांची प्रमुख उपस्थिती होती. शिंदे म्हणाल्या की, या निवडणुकीतील लढाई ही जात, पात व धर्मविरोधातील आहे. आपल्याला या गोष्टींना छेद देऊन लोकशाही मजबूत करावयाची आहे. या सत्याच्या लढाईत लोकांसाठी काहीच काम न करणारे कमकुमवत लोक एका महिलेविरोधात उभे आहेत. स्वत:चा मतदारसंघ सोडून ते दुसर्‍यांच्या मतदारसंघात निवडणूक लढवित आहेत. माझ्या शिक्षण संस्था वा कारखाने नाहीत. केवळ जनसेवेचा वसा घेऊन मी काम करीत आहेत. त्यामुळे ही निवडणूक मतदारांनी गांभीर्याने घेऊन काम करणार्‍यांनाच निवडून द्यावे, असे आवाहन आ. शिंदे यांनी केले. बैठकीला दत्ता कांबळे, विकी साठे, संतोष क्षीरसागर, किसन सकट, विलास उडाणशिव, बाळू गायकवाड, राजू प्याटी आदी उपस्थित होते..

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages