मोहोळ (प्रतिनिधी)ः जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्यात विजयराज डोंगरेंनी विकासाचा झंझावात निर्माण केला आहे. तालुक्यासह मतदारसंघाच्या विकासाचा २५ वर्षाचा बॅकलॉग भरुन काढण्यासाठी आता तालुक्याला आपल्या विचाराचा आमदार पाहिजे असे सांगुन तालुक्यातील दहशत, दादागिरी, गुंडगिरी जे काही असेल ती केव्हाच संपली असुन स्व.पंडीत देशमुख, मनोहरभाऊ यांच्या रुपाने रक्तरंजित इतिहास घडला आहे. आता तालुक्याला खर्या अर्थाने विकासाची गरज असुन या विकासासाठी शिवसेनेसोबत चला असे आवाहन भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा भीमा चे चेअरमन धनंजय महाडिक यांनी केले आहे.
टाकळी सिकंदर (ता.मोहोळ) येथे भीमा परिवाराचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करुन शिवसेनेचे उमेदवार नागनाथ क्षीरसागर यांना पाठिंबा देण्यात आला यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर भीमाचे व्हाईस चेअरमन सतिश जगताप, प्रकाश वानकर, दीपक गायकवाड, बबनदादा महाडिक, महेश देशमुख, चरण चवरे, शंकरराव वाघमारे, अशोक भोसले, बाळासाहेब गायकवाड. पं.स. सदस्या सुनिता भोसले, शिवाजी गुंड-पाटील, सुरेश शिवपुजे, यशवंत नरुटे, सुरेश सावंत, सुनील चव्हाण, संग्राम चव्हाण, अंकुश आवताडे, बाबासाहेब जाधव, धनाजी पुजारी, संतोष चव्हाण, सोमेश क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र हा पॅटर्न विकासाच्या दिशेने गेल्याने पुन्हा एकदा देशात लाट उसळली अन् पुन्हा एकहाती सरकार स्थापन झाले. देशात राज्यात विकासाचा झंझावात असताना तालुका मात्र विकासासाठी वंचित राहिला आहे. भीमा कारखाना, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून राष्ट्रवादी संपली असुन आता हा सुवर्णयोग असुन भीमा परिवार आज पहिल्यांदा विधानसभेच्या रिंगणात उतरल्याने विजयावर शिक्कामोर्तब करा असे त्यांनी सांगितले.
यावेळी युवराज चौगुले, लिंगेश्वर निकम, अंबादास भोसले, दादा उन्हाळे, जमीर मुजावर, संजय यादव, संचालक दादासाहेब शिंदे, गणपत पुदे, अंकुश गवळी, तुषार चव्हाण, दीलिप रणदिवे, बापु चव्हाण, अनिल गवळी, सिद्राम मदने, राजु टेकळे, दत्तात्रय पांढरे, सज्जन पवार, उत्तम मुळे, विलास तेरवे, धनाजी मदने यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टाकळी सिकंदर (ता.मोहोळ) येथे भीमा परिवाराचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करुन शिवसेनेचे उमेदवार नागनाथ क्षीरसागर यांना पाठिंबा देण्यात आला यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर भीमाचे व्हाईस चेअरमन सतिश जगताप, प्रकाश वानकर, दीपक गायकवाड, बबनदादा महाडिक, महेश देशमुख, चरण चवरे, शंकरराव वाघमारे, अशोक भोसले, बाळासाहेब गायकवाड. पं.स. सदस्या सुनिता भोसले, शिवाजी गुंड-पाटील, सुरेश शिवपुजे, यशवंत नरुटे, सुरेश सावंत, सुनील चव्हाण, संग्राम चव्हाण, अंकुश आवताडे, बाबासाहेब जाधव, धनाजी पुजारी, संतोष चव्हाण, सोमेश क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र हा पॅटर्न विकासाच्या दिशेने गेल्याने पुन्हा एकदा देशात लाट उसळली अन् पुन्हा एकहाती सरकार स्थापन झाले. देशात राज्यात विकासाचा झंझावात असताना तालुका मात्र विकासासाठी वंचित राहिला आहे. भीमा कारखाना, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून राष्ट्रवादी संपली असुन आता हा सुवर्णयोग असुन भीमा परिवार आज पहिल्यांदा विधानसभेच्या रिंगणात उतरल्याने विजयावर शिक्कामोर्तब करा असे त्यांनी सांगितले.यावेळी युवराज चौगुले, लिंगेश्वर निकम, अंबादास भोसले, दादा उन्हाळे, जमीर मुजावर, संजय यादव, संचालक दादासाहेब शिंदे, गणपत पुदे, अंकुश गवळी, तुषार चव्हाण, दीलिप रणदिवे, बापु चव्हाण, अनिल गवळी, सिद्राम मदने, राजु टेकळे, दत्तात्रय पांढरे, सज्जन पवार, उत्तम मुळे, विलास तेरवे, धनाजी मदने यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment