सोलापूर,:- 246 बार्शी विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची दुसरी तपासणी दि. 16 ऑक्टोबर 2019 रोजी खर्च निरिक्षक राघवेंद्र पी. यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालय, बार्शी येथे करण्यात आली. या तपासणीवेळी अनुपस्थित असलेबाबत राजकीय पक्षांचे कनिष्क सुरेश शिंदे, नागनाथ अभिमानु चावण या उमेदवारांना नोटीस देण्यात आलेली आहे. अॅङ दिलीप सोपल ( राजकीय पक्ष) , राजेंद्र राऊत (अपक्ष), भुमकर निरंजन प्रकाश ( राजकीय पक्ष) यांना निवडणूक खर्चामध्ये तफावत आढळून आल्याने त्यांना नोटीस देण्यात आली. याचवेळी जगन्नाथ निवृत्ती मुंडे या उमेदवारांना निवडणूक खर्च बँकेमार्फत करण्यात आलेला नसलेने त्यांना नोटीस देण्यात आली आहे. या सर्व उमेदवारांना नोटीस मिळालेनंतर 48 तासात खुलासा करण्याविषयी खर्च निरिक्षक यांनी निर्देशित केले आहे, असे निवडणुक निर्णय अधिकारी उत्तम पाटील यांनी कळविले आहे बार्शी विधानसभा मतदारसंघातील खर्च निरिक्षक राघवेंद्र पी. यांनी उमेदवारांच्या खर्चाची तपासणी करुन, खर्च तपासणी पथकातील सर्व सदस्य, उपस्थित उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांना निवडणूक खर्च सादर करण्याबाबत सूचना व मार्गदर्शन केले, असेही श्री. पाटील यांनी सांगितले.
Post Top Ad
Wednesday, October 16, 2019
बार्शी विधानसभा मतदारसंघातील सहा उमेदवारांना नोटीस
Tags
# राजकरण
# सोलापूर जिल्हा
Share This
About Katusatya CP
सोलापूर जिल्हा
Tags
राजकरण,
सोलापूर जिल्हा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
Templatesyard is a blogger resources site is a provider of high quality blogger template with premium looking layout and robust design. The main mission of templatesyard is to provide the best quality blogger templates which are professionally designed and perfectlly seo optimized to deliver best result for your blog.
No comments:
Post a Comment