लोकसभेत विकासाला आड येणारी जिल्ह्याची कीड घालवली विधानसभेत तालुक्यातील कीड घालावा - शिवतेजसिंह मोहिते पाटील यांचे मतदारांना आवाहन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, October 15, 2019

लोकसभेत विकासाला आड येणारी जिल्ह्याची कीड घालवली विधानसभेत तालुक्यातील कीड घालावा - शिवतेजसिंह मोहिते पाटील यांचे मतदारांना आवाहन

लोकसभेत विकासाला आड येणारी जिल्ह्याची कीड घालवली विधानसभेत तालुक्यातील कीड घालावा
- शिवतेजसिंह मोहिते पाटील यांचे मतदारांना आवाहन



अकलूज: विकास कामात राजकारण करणाऱ्या स्वार्थी लोकांना त्यांची जागा दाखवण्या बरोबरच लोकसभेत ज्या प्रमाणे जिल्ह्याच्या विकासाला लागलेली कीड घालवली त्या प्रमाणे आताच्या विधानसभेतही तालुक्याच्या विकासाला लागलेली कीड कायमस्वरूपी घालवण्यासाठी भारतीय जनता पक्ष व महायुतीचे अधिकृत उमेदवार राम सातपुते यांना विक्रमी मतांनी निवडून देण्याचे आवाहन अकलूजचे सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी केले.
राम सातपुते यांच्या प्रचारार्थ अकलूज येथील  राऊत नगर, नवीन बाजार तळ,  शिवाजी चौक व महादेवनगर, माळवाडी(अ) याठिकाणी कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. तत्पूर्वी सकाळी वार्ड क्र.3 व 4 मधून पदयात्रा काढण्यात आली.  या सभेत जि.प.सदस्या सौ.शितलदेवी मोहिते पाटील, जेष्ठ ग्रा.पं. सदस्य मा.किशोरसिंह माने पाटील, विश्वतेजसिंह रणजितसिंह मोहिते पाटील, उपसरपंच धनंजय देशमुख,मुख्तार कोरबू, महादेव कावळे, शेखर माने, फातिमा  पाटावाला, शशिकला भरते, विठ्ठल गायकवाड, अरुण मोरे, किरण धाइंजे, अजित मोरे, नंदू केंगर, विजय कोकणे, प्रवीण साळवे, सचिन लोंढे, कबीर मोरे, दादा तांबोळी, शेखर माने, आनीसा तांबोळी, सुभद्रा वाईकर व महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.
शिवतेजसिंह पुढे म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानातील आरक्षणाला हरताळ फासत खोट्या जातीच्या दाखल्यावर निवडणुका लढवणाऱ्या विरोधकाबाबत आंबेडकरी जनतेतून प्रचंड चीड व्यक्त होताना दिसत असल्याचेही शिवतेजसिंह यांनी सांगितले.
तसेच आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर माढा मतदार संघातून लोकसभेत ज्याप्रमाणे विक्रमी लिड दिले त्याची दखल घेत राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी केवळ चार महिन्यात विविध विकास कामांसाठी 207 कोटींचा निधी आपल्या तालुक्याला दिला आहे. या पुढेही तालुक्याच्या विकासासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचा तसेच कृष्णा भीमा स्थिरीकरण व समांतर पाईपलाईन असे महत्वपूर्ण प्रश्न मार्गी लावण्यासाठी भारतीय जनता पक्ष व महायुतीचे अधिकृत उमेदवार राम सातपुते यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले. 
यावेळी बोलताना शितलदेवी यांनी उमेदवार राम सातपुते यांचा परिचय करून देत अकलूज परिसरात झालेल्या विकास कामाची माहिती दिली.
यावेळी उपसरपंच धनंजय देशमुख, किशोरसिंह माने पाटील, मुख्तार कोरबू याचीही भाषणे झाली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages