नरखेड(ता मोहोळ)येथील सोलापूर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष संतोष पाटील यांनी कणकवली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे मंगळवारी कणकवली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यात आले.याच कार्यक्रमात संतोष पाटील यांनी भाजप मध्ये प्रवेश केला.पाटील हे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक प्रदेश सरचिटणीस होते.
मोहोळ विधानसभा मतदारसंघांमध्ये संतोष पाटील यांनी शिवसेनेचे बंडखोर उमेदवार मनोहर शेजवाल यांना पाठिंबा देऊन वडवळ येथे त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ केला होता ,या पार्श्वभूमीवर आता भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ते मोहोळ विधानसभा मतदारसंघांमध्ये काय भूमिका घेणार आणि यूतीचा धर्म म्हणून शिवसेना उमेदवाराच्या प्रचारामध्ये सक्रिय होणार का याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिट्ठी दिल्यानंतर संतोष पाटील हे राणे सोबत गेले होते.गेल्या अनेक दिवसांपासून राणे यांच्या बरोबरच संतोष पाटील हेही भाजप मध्ये जाणार असल्याच्या चर्चा होत्या.कणकवली येथे भाजपचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पाटील यांनी भाजप मध्ये प्रवेश केला.संतोष पाटील यांच्या भाजप प्रवेशाने मोहोळ तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.जुन्या नव्या कार्यकर्त्यानां सोबत घेऊन सोलापूर जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष वाढविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे संतोष पाटील यांनी भाजप प्रवेशानंतर सांगितले.

No comments:
Post a Comment